Thursday, April 25, 2024
Homeजळगावकत्तलीसाठी आणलेल्या गोवंशांना जीवदान

कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशांना जीवदान

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

शहरातील उस्मानिया पार्कमधील मुघल गार्डन परिसरातील सय्यद असरारूल कादरिया मशिदजवळ कत्तलीसाठी आणलेल्या 28 गोवंशांची सुटका करुन त्यांना गोशाळेत रवाना करुन जीवदान देण्यात आले. तसेच गोवंशाचे मांस देखील जप्त करण्यात आल्याची कारवाई गुरुवारी सकाळी 8 वाजता पोलीस उपअधिक्षक यांचे पथक व शहर पोलीसांच्या पथकाने केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या