Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘घर तेथे ग्रंथालय’ उपक्रम

‘घर तेथे ग्रंथालय’ उपक्रम

निफाड। प्रतिनिधी Niphad

भारताचे माजी राष्ट्रपती (Former President of India) डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम (Dr. A.P.J. Abdul Kalam) यांची जयंती (anniversary) वैनतेय विद्यालयात साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी (students) अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

- Advertisement -

करोना (corona) काळात विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले आहे. या मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे (Ranade Vidya Prasarak Mandal Sanstha) संस्थापक विश्वस्त वि.दा. व्यवहारे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी ‘घर तेथे ग्रंथालय’ (library) हा उपक्रम राबविण्यात आला.

गेल्या पंधरा दिवसापूर्वी विद्यालयाच्या सर्व तुकड्यांच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर (WhatsApp group) या विद्यार्थ्यांना ‘घर तेथे ग्रंथालय’ हा उपक्रम राबविण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत या उपक्रमंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घराच्या कोपर्‍यात छोटसं सात आठ किंवा त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकांचं वाचनालय उभं केलं आणि त्याचे फोटो काढले व ते घरातील ग्रंथालयाचे फोटो वर्गशिक्षकांना पाठवले होते.

या ‘घर तेथे ग्रंथालय’ उपक्रमामुळे करोनाच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांची जी मने अस्वस्थ होती त्यातून त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यांच्या चेहर्‍यावर मनाला आनंद मिळाला. मी पुस्तकांचं ग्रंथालय उभं करु शकतो ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. विद्यालयाच्या इयत्ता 5 वी ते 12 वी च्या एकूण 390 विद्यार्थ्यांनी ‘घर तेथे ग्रंथालय’ योजना राबवली.

15 दिवसांपूर्वी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिनापर्यंत 390 विद्यार्थ्यांनी आपल्या घरी छोटेसे ग्रंथालय उभारले व खरोखर प्रेरणा दिन कृतीयुक्त प्रत्यक्षात साजरा केला. हा उपक्रम पुढे काही दिवस राबविण्यात येणार आहे व वाचनासाठी प्रेरणा देण्याचं कार्य चालू ठेवण्यात येणार आहे.

सदर उपक्रम राबविण्यासाठी प्राचार्य एस.पी. गोरवे, उपप्राचार्य बी.आर. सोनावणे, पर्यवेक्षक एम.एस. माळी, एन.डी. शिरसाठ यांनी परिश्रम घेतले. सदर उपक्रमाचे न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. अप्पासाहेब उगावकर, वि.दा. व्यवहारे, रतन वडघुले, किरण कापसे, राजेंद्र राठी, अ‍ॅड. दिलीप वाघवकर, प्रभाकर कुयटे, राजेश सोनी, मधूकर राऊत, विश्वास कराड, नरेंद्र नांदे यांनी कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या