Saturday, April 27, 2024
Homeनगरवाचकांना घरबसल्या कळणार सार्वजनिक वाचनालयाची ग्रंथसंपदा!

वाचकांना घरबसल्या कळणार सार्वजनिक वाचनालयाची ग्रंथसंपदा!

ग्रंथालय संचालनालयाची जिल्हानिहाय माहिती इंटरनेट ‘क्लाऊड’वर  

ज्ञानेश दुधाडे

- Advertisement -

अहमदनगर – राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयात असणार्‍या ग्रंथ भंडार, विविध पुस्ताकांची माहिती आणि सभासद असणार्‍या वाचकांची नावे ऑनलाईन करण्याची प्रक्रिया राज्य ग्रंथालय संचालनालय सुरू केली आहे. यात जिल्हानिहाय असणार्‍या सार्वजनिक वाचनालयात असणार्‍या ग्रंथ भंडार आणि पुस्तकांची नावे तसेच सभासद वाचकांची सर्व माहिती क्लाऊड वे सर्व्हरवर टाकण्यात येत आहे. यामुळे आता वाचकांना घरबसल्या कोणत्या ग्रंथालयात कोणते ग्रंथ, पुस्तके उपलब्ध आहेत, याची माहिती मिळणार आहे.

राज्य सरकारच्या माहिती व उच्च तंत्रज्ञान विभागाने ग्रंथालय संचालनालय विभागाचे रुपडे पालटण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘ई’ ग्रंथालय संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी क्लाऊड सर्व्हरवर जिल्हानिहाय ग्रंथालय संचालनालयाची माहितीचा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

हे काम पूर्ण झाल्यावर ग्रंथालय संचालनालय देखील ऑनलाईल होणार आहे. राज्यात 34 जिल्हास्तरीय अ वर्गी, तालुका पातळीवर 133 अ वर्ग, 113 ब वर्ग, 33 क वर्ग, इतरमध्ये 176 अ वर्ग, 2 हजार 3 ब वर्ग, 4 हजार 122 क वर्ग असे 12 हजार 144 आणि ग्रामपंचायत चालविणारे 154 सार्वजनिक ग्रंथालय एकमेंकांना जोउली जाणार आहे. यामुळे वाचकांसाठी ही पर्वणी ठरणार असून नगर जिल्ह्यातील 514 सर्व वर्गातील सार्वजनिक वाचनालय आणि 20 ग्रामपंचायती संचलीत वाचनालय यांचा या ऑनलाईन लाईन प्रणालीत समावेश राहणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी दिली.
………..
जिल्ह्यासाठी चार कोटींचे अनुदान
दरवर्षी जिल्ह्यात चालविण्यात येणार्‍या वाचनालयासाठी 4 कोटी रुपयांचे अनुदान मिळते. यात जिल्हा वाचनालयासाठी वर्षाला 7 लाख 20 हजार तर तालुकास्तरावरील अ वाचनालयासाठी 3 लाख 84 हजार प्रत्येकी, इतर प्रकारातील अ वर्ग वाचनालयासाठी 2 लाख 88 हजार प्रत्येकी, ब वर्ग जिल्हा वाचनालयासाठी 3 लाख 84 हजार प्रत्येकी, ब वर्ग तालुका वाचनालयासाठी 2 लाख 88 हजार प्रत्येकी, ब वर्ग इतर वाचालयानासाठी 1 लाख 92 हजार, क वर्ग तालुका वाचनालयासाठी 1 लाख 44 हजार प्रत्येकी, क वर्ग इतर वाचनलयासाठी 96 हजार आणि ड वर्ग वाचनयासाठी 30 हजार रुपये प्रत्येकी अनुदान देण्यात येते.
………………
असे आहेत जिल्ह्यात वाचनालय
जिल्हा वाचनालय 1, तालुका वाचनालय अ जामखेड, पारनेर, राहुरी, शेवगाव आणि श्रीरामपूर येथे आहेत. तालुका ब वर्ग वाचनालय अकोले, नगर, कोपरगाव, कर्जत, राहाता आणि संगमनेर येथे आहेत. तालुका क वर्ग वाचनालय नेवासा, पारनेर आणि श्रीगोंदा येथे आहेत. इतर अ वर्गात कोपरगाव, पारनेर आणि राहुरीत आहेत. इतर ब वर्गात अकोले 5, नगर 8, कोपरगाव 5, जामखेड 2, नेवासा 13, पाथर्डी 2, पारनेर 4, राहाता 3, राहुरी 8, शेवगाव 7, श्रीगांेंदा 1, श्रीरामपूर आणि संगमनेर प्रत्येकी 3. इतर क वर्गात अकोले 7, नगर 22, कर्जत 5, कोपरगाव 8, जामखेड 4, नेवासा 31, पाथर्डी 31पारनेर 16, राहाता 8, राहुरी 17, शेवगाव 14, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 2, संगमनेर 16 यांचा समावेश आहे. तर ड वर्गात अकोले 2, नगर 32, कर्जत 22, कोपरगाव 13, जामखेड 12, नेवासा 22, पाथर्डी 40, पारनेर 40, राहाता 1, राहुरी 16, शेवगाव 33, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 6, संगमनेर 7 यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या