पुनदखोरे | Punadkhore
कळवण तालुक्यातील पाळेपिंप्री येथे शनिवारी (दि.२०) रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास कळवण परिमंडळातील मौजे, मार्कंडपिंप्री येथे राखीव वनकक्ष क्रमांक २९७ ,वनपाल, वनरक्षक हे सदर जंगल भागात गस्त करीत असताना अंदाजे अडीच ते तीन वर्षे वयाची मादी बिबट मृत अवस्थेत आढळून आली.
सदर मृत मादी बिबटयाचा घटनास्थळी पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी मृत बिबटयास नाकोडा येथील रोपवाटिकेत आणण्यात आले.
यावेळी पशुवैधकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले की, मृत बिबट्याचा मागील डावा पाय हा एक ते दीड वर्षांपासून अधू झालेला असावा. त्यामुळे त्याला शिकार करता येत नसल्याने ह्या मादी बिबट्याच्या अन्ननलिकेत रक्त गोठल्याने तसेच उपासमारीमुळे दोन दिवसांपूर्वीच बिबटया मयत झाल्याचे डॉ. सातपुते व डॉ. महाले यांनी सांगितले.
नियमानुसार कार्यवाही करून ह्या मादी बिबट्यावर अंत्यसंस्कार केले असून पुढील तपास चालू आहे.