Thursday, April 25, 2024
Homeनगरकारागृहातून रजेवर सुटलेला आरोपी पसार

कारागृहातून रजेवर सुटलेला आरोपी पसार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य शासनाच्या (State Government) तसेच उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार करोना काळात 45 दिवसांच्या आपत्कालीन आकस्मित अभिवचन रजेवर (leave) मुक्त केलेला आरोपी (Accused) त्यानंतरच्या काळात कारागृहात हजर न होता पसार झाल्याचे उघडकीस आले आहे.

- Advertisement -

राजेंद्र बाबाजी भोर (रा. भोरवाडी ता.नगर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द विसापूर कारागृहातील (Visapur Jail) पोलीस अंमलदार अब्दुल हमीद बर्फीवाले यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) फिर्याद दिली आहे. आरोपी राजेंद्र भोर हा विसापूर कारागृहात शिक्षा भोगत होता. करोना काळात शासनाच्या आदेशानुसार त्याला 19 मे 2020 रोजी 45 दिवसांच्या आपत्कालीन आकस्मित अभिवचन रजेवर (leave) मुक्त करण्यात आले होते.

त्यानंतर त्याला वेळोवेळी 30 दिवसांची रजा वाढवून देण्यात आली. नंतर तो 18 जून 2022 रोजी कारागृहात हजर होणे आवश्यक होते. परंतु तो हजर झालेला नाही. त्यामुळे त्याच्याविरूध्द फिर्याद देण्यात आली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी राजेंद्र भोर विरूध्द भादंवि कलम 224 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या