Lata Mangeshkar : …तेव्हा लतादीदींनी साई संस्थानच्या विनंतीला तात्काळ दिला होकार!

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी | शहर प्रतिनिधी

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं नुकतचं निधन झालं असून वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

लता मंगेशकर आणी त्यांच्या कुटुंबाची जगप्रसिद्ध शिर्डीच्या साईबाबांवर अतुट श्रद्धा होती. संपुर्ण विश्वाला श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या चारही प्रहरच्या आरत्या त्याचप्रमाणे “एव्हरीबडी लव साई” या हिंदी साईभक्तीगीत गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात स्वरबद्ध केले असून साईंच्या प्रचार प्रसारामध्ये लतादिदींचा महत्त्वपुर्ण योगदान आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने देशाने एक अनमोल रत्न गमावला असल्याची खंत साईसंस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे यांनी व्यक्त केली.

साधारणपणे २००५ मध्ये साईसंस्थानचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या कार्यकाळात लतादिदी आणी त्यांची बहिण उषा मंगेशकर साईदर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. त्यावेळी लतादिदींच्या हस्ते साईसमाधीची पाद्यपूजा व शिर्डी माझे पंढरपूर आरती करण्यात आली होती. त्यावेळी संस्थानचे माजी अध्यक्ष स्व.जयंतराव ससाणे तसेच विश्वस्त सुरेश वाबळे, विश्वस्त कैलासबापू कोते,विश्वस्त अशोक खांबेकर, राजश्री ससाणे, साईसंस्थानचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे आदीसह मान्यवर उपस्थित होते.

दर्शनानंतर लतादिदी व त्यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांचा साईसंस्थानचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी साईसंस्थानच्या वतीने लतादिदींना साईबाबांच्या दैनंदिन चारही प्रहरच्या आरत्या आपल्या सुरेल आवाजात गाव्यात अशी विनंती केली होती. विश्वस्तांच्या विनंतीला तात्काळ होकार देत त्यांनी आरत्या गाणार असल्याचे सांगितले.

Lata Mangeshkar : जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

त्याप्रमाणे चार आरत्यांंसाठी एका आँडीओ बनविणाऱ्या कंपणीला ठेका देण्यात आला. त्यानंतर त्यांनी साईंच्या आरत्या सुरेल आवाजात गाऊन मोठ्या प्रमाणावर साईभक्तांना मंत्रमुग्ध केले. ‘एवरीबडी लव साई’ हे साईबाबांचे हिंदी भक्तीगीत गाऊन साईंबद्दल मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आहे.

‘लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशाचे वैभव हरपले’

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *