Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या...म्हणून शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले; अखेर 'नेमके' कारण आले...

…म्हणून शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले; अखेर ‘नेमके’ कारण आले समोर

दिल्ली | Delhi

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीत आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.

- Advertisement -

संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयात (PMO) या दोन्ही नेत्यांमध्ये दुपारी १२.२० नंतर सुमारे २०-२५ मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण होत. मात्र या भेटीचे कारण अखेर समोर आले आहे.

लक्षद्वीपच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती शरद पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच महाराष्ट्रातील कारवायांसदर्भात पंतप्रधान मोदींशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियमांनुसार काम करत नाहीत, ही गोष्ट आपण पंतप्रधानांच्या कानावर घातली. तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचा मुद्दाही पंतप्रधानांसमोर मांडल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या