Thursday, April 25, 2024
Homeनगरशॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून भस्मसात

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून भस्मसात

कळस (प्रतिनिधी)

अकोले तालुक्यातील कळस येथे एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

कळस बु. येथील ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वाकचौरे, पांडुरंग वाकचौरे व प्रविण वाकचौरे यांच्या घराला सकाळी नऊच्या दरम्यान लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीचा प्रचंड वेग असल्याने काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केल्याने घरातील सर्व उपयोगी वस्तु जळुन खाक झाल्या आहे.

शहरात पुन्हा वाढली ‘करोना’ची भीती; कंटेन्मेंट झोन जाहीर

तातडीने अगस्ती कारखान्याचा अग्निशमन दल पाचारण करण्यात आले व ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीला विझविण्यात यश मिळाले. सदर घर जुन्या सागवानाचे असल्यामुळे सागवानाने पेट घेऊन लाखोंचे नुसकान झाले आहे.

सदर ठिकाणी कळस गावचे पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याचे आदेश दिले. महावितरण चे इंजी श्रीराम साहेब तसेच तलाठी प्रमोद शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामे केले. पंचनामे करून तातडीने प्रशासनाने योग्य ती मदत सदर कुटुंबास करावी अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे..

- Advertisment -

ताज्या बातम्या