Friday, April 26, 2024
Homeनाशिकइमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

नाशिक । Nashik

बांधकाम व्यावसायिकाने (Builders) सुरक्षेची कुठलीही व्यवस्था केली नसल्याने इमारतीच्या (building) सातव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा (laborer) दुर्दैवी मृत्यू (death) झाल्याची घटना वडाळा गावानजीक घडली आहे…

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आय.एन.डी. डेव्हलपर्स सिग्निफिकंट इमारत सोसायटीच्या मागे, गरीब नवाज कॉलनी, वडाळा गाव, नाशिक (Wadala village Nashik) येथे (दि. २६) किस्कु उर्फ बबलू मुरमु ठाकूर (Bablu Murmu Thakur) वय (५४) रा. बागनवारी,उत्तर मिदनापूर,पश्चिम बंगाल) हे बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना सातव्या मजल्यावरून (seventh floor) खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्या दुखापतीत त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी ईश्वर रघुनाथ शिंदे (Ishwar Raghunath Shinde) वय (३२) रा. फ्लॅट नंबर ५/६ गुरुज्योत सोसायटी, दत्त मंदिर रोड, सुराणा हॉस्पिटल जवळ, नाशिकरोड यांच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल (Filed case) करण्यात आला असून पुढील तपास सपोनि बोंडे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या