Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedयोगा करून युवा डान्सिंग क्वीन कृतिका ठेवतेय फिटनेस

योगा करून युवा डान्सिंग क्वीन कृतिका ठेवतेय फिटनेस

वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे.

योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात.

- Advertisement -

परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.आणि म्हणूनच युवा डान्सिंग क्वीन कृतिका गायकवाड तिच्या बिझी शेड्युलमध्ये सुद्धा रोज दररोज योगा करते .

सौंदर्यवान आणि फीट दिसणं यासाठी कृतिका खूप मेहनत घेते . ती दिवसाची सुरुवात योगा ने करते . ही प्रसिद्ध युवा डान्सिंग क्वीन स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दिवसातून 108 वेळा सूर्य नमस्कार करते.

ती नियमितपणे आष्ठांग योगही करते. तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले होते . अतिशय टॅलेंटेड अभिनेत्री आणि उत्तम नर्तिका म्हणून कृतिका गायकवाड ने युवा डान्सिंग क्वीन च्या व्यासपीठामुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे.

नियमित योगा करण्याबद्दल कृतिका सांगते, ” युवा डान्सिंग क्वीन मुळे मी सध्या खूप बिझी असते आणि सतत मनावर स्पर्धेत टिकण्याचा ताण ही असतो त्यामुळे दररोज योगा हाच माझा फिटनेस फंडा आहे . नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे.रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो.

योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव जेंव्हा तुम्ही दररोज योगा करता तेव्हा येतो.”

- Advertisment -

ताज्या बातम्या