Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोपरगाव : 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 996 उमेदवारी अर्ज दाखल

कोपरगाव : 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 996 उमेदवारी अर्ज दाखल

कोपरगाव (प्रतिनिधी) –

तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या उमेदवार अर्ज भरणे प्रक्रीयेच्या शेवटच्या दिवशी 540 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून एकूण

- Advertisement -

996 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

दि. 23 डिसेंबर राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील उक्कडगाव 38 (पुरुष-20,स्री-18), तिळवणी 21 (पुरुष-08 ,स्री-13), अंजनापूर 28 (पुरुष-11,स्री-17), घारी 34 (पुरुष-17,स्री-17), मनेगाव 25 ( पुरुष-12 ,स्री-13), मळेगाव थडी 36 (पुरुष-15,स्री-21), सांगवी भुसार 32 (पुरुष-15 ,स्री-17), वेळापूर 32 (पुरुष-17 ,स्री-15), जेऊर पाटोदा 34 (पुरुष-16,स्री-19), काकडी 36 (पुरुष-20,स्री-16), नाटेगांव 21 (पुरुष-10,स्री-11), कासली 25 (पुरुष-09, स्री-16), ओगदी 22 (पुरुष-09 ,स्री-13), अंचलगाव 23 (पुरुष-10,स्री-13), कोळगाव थडी 58 (पुरुष-31,स्री-27), मायगाव देवी 27 (पुरुष-14,स्री-13), हिंगणी 27 ( पुरुष-12,स्री-15), रवंदे 27 ( पुरुष-13,स्री-14), संवत्सर 117 (पुरुष-63,स्री-54), देर्डे चांदवड 20 (पुरुष-10,स्री-10), मढी खुर्द 30 (पुरुष-14,स्री-16), मढी बुद्रुक 33 (पुरुष-15,स्री-18), धोंडेवाडी 31 (पुरुष-09,स्री-22), सोनारी 21 (पुरुष-09,स्री-12), आपेगाव 34 (पुरुष-16,स्री-18), येसगाव 36 (पुरुष-13,स्री-23), टाकळी 35 (पुरुष-21,स्री-14), कोकमठाण 58 (पुरुष-29,स्री-29), जेऊर कुंभारी 35 (पुरुष-15, स्री-20) याप्रमाणे एकूण 996 अर्ज दाखल झाले आहेत. 29 ग्रामपंचायतींत दाखल झालेल्या अर्जाची छाननी दि.31 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11:00 वाजता होत असून या प्रक्रियेकरिता निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे उपस्थित राहणार आहेत. तसेच सोमवारी 4 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान शुक्रवारी 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 07:30 ते सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत राहणार आहे. मतमोजणी सोमवारी 18 जानेवारी 2021 रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी 10:00 वाजेपासून सुरू होईल,अशी माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे. सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे यांच्यासह विविध खातेनिहाय कर्मचारी सहाय्य करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या