Tuesday, April 23, 2024
Homeनगरकोळपेवाडी दशक्रियाविधी घाट दुरुस्तीसाठी ग्रामस्थाचे ना. काळे यांना साकडे

कोळपेवाडी दशक्रियाविधी घाट दुरुस्तीसाठी ग्रामस्थाचे ना. काळे यांना साकडे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील कोळपेवाडी येथील गोदावरी उजव्या कॅनालवरील दशक्रियाविधी घाटाचे दगड निखळून पडल्याने घाटाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी ना. आशुतोष काळे यांना साकडे घातले आहे.

- Advertisement -

कोळपेवाडी गोदावरी उजव्या कॅलवा पाचचारी संगमावरती कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगावथडी या तिन गावचे दशक्रियाविधी पार पडत असतात. पंचवीस वर्षापूर्वी जलसंपदा विभागाने बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी घाटाची दुरुस्ती वेळोवेळी न झाल्याने प्रवाहाच्या पाण्यात दगड वाहुन गेल्याने घाट नव्याने बांधण्याच्या प्रतिक्षेत आहे.

हिरवाईने बहरलेले आंबा, जांभूळ, वड, चिंच वृक्षाच्या सानिध्यात पक्षांना हक्काचा निवारा मिळत असल्याने बगळा, कावळे, सांळुकी, चिमणी यांचे कायमस्वरूपी वास्तव्य निसर्ग सौंदर्याची अनुभूती देत असते. सकाळी नऊच्या आत विनाविलंब पिंडांना होत असलेला काक स्पर्श समाजाला मयताच्या कुटुंबियांप्रती जिवनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्याची जाणीव देत असल्याने एकाच दिवशी तिन ते चार दशक्रियाविधी या ठिकाणी पार पडत असतात. बैठक शेड स्वयंपाक घर, प्रवचन व्यासपीठ, पाण्याची टाकी, बाथरूम शौचालय घाट काँक्रीटीकरण आदी पायाभूत सुविधांचे काम तात्काळ हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या