Friday, April 26, 2024
Homeनगरकोल्हे कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट इनोव्हेटीव्ह शुगर प्लॅन्ट पारितोषिक

कोल्हे कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट इनोव्हेटीव्ह शुगर प्लॅन्ट पारितोषिक

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने देशपातळीवर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने नावलौकीक प्राप्त केला असून राष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या भारतीय शुगर या संस्थेने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची चालू वर्षाकरिता बेस्ट इनोव्हेटीव्ह शुगर प्लॅन्ट या पारितोषिकासाठी निवड केल्याची माहिती सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.

- Advertisement -

बिपीन कोल्हे म्हणाले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आजवर राज्य व देशपातळीवर विविध 21 पारितोषिके मिळविली असून भारतीय शुगरच्या राष्ट्रीय पारितोषिकामुळे कोल्हे कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सदर पारितोषिकाची निवड देशातील सहकारी साखर कारखानदारी मधून केली जाते. सन 2022 या वर्षाकरिता भारतीय शुगरच्या टीमने संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखान्याचा अभ्यास करून सहकारी तत्त्वावरील इनोव्हेटीव्ह प्लॅन्ट म्हणून सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याची निवड केली आहे.

इफिसिएंट सल्फरलेस शुगर, को जनरेशन, डिस्टीलरी, लिकर, अ‍ॅसिटीक सिड, अ‍ॅसिटीक अनहैड्राईड, इथाईल अ‍ॅसिटेट, बायो एनर्जी, बायो कंपोष्ट, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे अंतिम टप्प्यामधील पॅरासिटामॉल, ट्राय इथाईल ऑर्थोफॉरमेट, ई.एम. एम. ई. हे बारा उपपदार्थाचे निकष या निवडीसाठी विचारात घेण्यात आले आहेत. अशा प्रकारे साखरेबरोबरच अन्य 12 उपपदार्थ निर्मिती करणारा देशातील सहकारी साखर कारखानदारीमधील एकमेव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना ठरला आहे. त्यामुळेच आपणास राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखानदारीतील ओव्हरऑल बेस्ट इनोव्हेटीव्ह प्लॅन्ट म्हणून पारितोषिक जाहीर झाले आहे असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे म्हणाले, स्व. शंकररावजी कोल्हे यांनी आतापर्यंत सहकारी साखर कारखानदारीत वेगवेगळे अनेक प्रयोग यशस्वी करून दाखविले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व नॅशनल हेवी इंजिनियरींग इत्यादी सहकारी साखर कारखानदारीशी संबंधित आंतरराष्ट्रीय व देशपातळीवरील संस्था उभारणी करीत असताना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखानदारीत संशोधन आणि विकास या आवश्यक बाबी निरंतर चालू ठेवल्या व त्यायोगे हे पारितोषिक त्यांच्या पश्चात मिळणे म्हणजे स्व. शंकररावजी कोल्हे यांनी केलेल्या कामाचे व योगदानाचे फलीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या पारितोषिकामुळे संजीवनी उद्योग समुहाचा व देशातील सहकारी संस्थांचा लेखाजोखा भारतीय शुगरने राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम केले ,असे मत स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले. पारितोषिक हे जून 2022 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुणे येथे एएनएसआय कानपूरचे संचालक प्रा. नरेंद्र मोहन व साखर आयुक्त शेखरजी गायकवाड व भारतीय शुगरचे सर्व पदाधिकारी व अधिकारी तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व मान्यवर संचालक यांच्या उपस्थितीत प्रदान केले जाणार असल्याची माहिती भारतीय शुगरचे प्रेसिडेंट विक्रमसिंह शिंदे व चीफ ऑपरेटींग ऑफिसर संग्रामसिंह शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, संचालक विवेक कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, संचालक अरूण येवले, संजय होन, मनेष गाडे, सोपानराव पानगव्हाणे, शिवाजी वक्ते, विलास वाबळे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर परजणे, फकिरराव बोरनारे, अशोक औताडे, प्रदीप नवले, मच्छिंद्र लोणारी, वेणूनाथ बोळीज, संगिता नरोडे, सोनूबाई भाकरे, बाळासाहेब नरोडे, अशोकराव भाकरे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव तुळशीराम कानवडे, एच. आर. मॅनेजर प्रदीप गुरव यांच्यासह सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या