Saturday, April 27, 2024
Homeनाशिककोकाटेंनी स्वबळ भुमिकेचा फेरविचार करावा

कोकाटेंनी स्वबळ भुमिकेचा फेरविचार करावा

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

सिन्नर (Sinnar) विधानसभा निवडणूकीत (Assembly elections) मिळालेला विजय हा तालुका काँग्रेस व पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्यामूळे झाला असल्याचा आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांना विसर पडला आहे. त्यामूळेच आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणूका (Zilla Parishad elections) स्वबळावर लढण्याची भाषा ते करीत आहेत.

- Advertisement -

विधानसभा निवडणूकीतील आघाडीच्या मदतीचा विसर पडलेल्या कोकाटे यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा काँग्रेसही (Congress Party) स्वबळावर निवडणूक लढवेल असा इशारा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे (Vinays Sangle) यांनी दिला. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजीत तालुका काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते.

विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सिन्नरची (Sinnar) जागा काँग्रेसने राष्ट्रवादीकरीता सोडली व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळत प्रामाणिकपणे काम केल्यामूळेच कोकाटेंचा विजय झाला. त्यात पालकमंत्री भुजबळ यांचीही भुमिका महत्वाची ठरली आणि तालुक्यातील त्यांच्या विचारांच्या मतदारांनी कोकाटे यांना भरभरुन मते दिली. या बाबीचा कोकाटे यांना फारच लवकर विसर पडला आहे.

तालुक्याच्या विकासाकरता कोकाटे यांच्या माध्यमातून निधी (Fund) आला हे खरे आहे. मात्र, हा निधी देण्यामध्ये सर्वात मोठे योगदान हे काँग्रेस पक्षाचे तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) व भुजबळ यांचे आहे. विधानसभेचा विजय हा राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसचाही विजय आहे हे त्यांनी विसरु नये. त्यामूळे कुणालाही बरोबर न घेता ‘एकला चलो रे’ अशी भूमिका न घेता कोकाटेंनी त्यांच्या वक्तव्याचा फेरविचार करावा अन्यथा अगामी सर्व निवडणूका काँगे्रसही स्वबळावर लढू शकते असा इशारा सांगळे यांनी दिला.

मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत कोकाटे राष्ट्रवादीत नव्हते. त्यावेळी समीर भुजबळ यांच्यासाठीही तालुका काँग्रेसने प्रामाणिकपणे काम केले होते याची आठवण सांगळे यांनी करुन दिली. कोकाटे यांचा विजय केवळ दोन-अडीच हजारांनी झाला असून ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी भूमिका त्यांनी घेणे योग्य नाही असा टोलाही त्यांनी मारला.

उत्तर प्रदेशमध्ये गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाने शेतकर्‍यांवर गाडी घालून 4 शेतकर्‍यांची हत्या केल्याचा यावेळी निषेध करण्यात येऊन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मयत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना अटक केल्याचाहीे निषेध करण्यात आला. या शेतकर्‍यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्व गुन्हेगारांना अटक करुन योग्य ती शिक्षा मिळावी अशी मागणीही करण्यात आली.

शेतकर्‍यांच्या हत्येसंदर्भात केंद्र सरकार (Central Government) कारवाई करायला तयार नसल्याने, या निष्ठूर सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली असून बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तालुक्यातील व्यापार्‍यांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मोदी सरकारने (Modi Government) डिझेल (Diesel), पेट्रोलचे (Petrol) व घरगूती सिलेंडरचे दर वाढवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून ही दरवाढ त्वरीत मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुजाहिद खतीब, तालुका समन्वयक उदय जाधव, जिल्हा युवकचे अध्यक्ष दिनेश चोथवे, अश्फाक शेख, बाळासाहेब गोरडे, संतोष जोशी, ज्ञानेश्वर लोखंडे, सोमनाथ बिडवे, रतन तुपे, रावसाहेब थोरात, योगिता मोरे, गोपीनाथ झगडे, वामनराव उकाडे, जाकीर शेख, जहीर शेख, समाधान कदम, आनंदा कदम यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या