Friday, April 26, 2024
Homeनाशिकभांडण सोडवणाऱ्यावरच केले चाकूने वार

भांडण सोडवणाऱ्यावरच केले चाकूने वार

नाशिक | प्रतिनिधी

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या एकावर चाकूने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना पंचवटीतील इंद्रकुंड परिसरात घडली…

- Advertisement -

अनिरूद्ध रजेंद्र आंबेकर, धर्मेश प्रदिप परमार, राज प्रदिप परमार (रा. सर्व रविवार कारंजा) अशी चाकू हल्ला करणार्‍या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी शुभम संजय राजगुरू (रा. पंचवटी कारंजा) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार इंद्रकुंड परिसरात रजगुरू याचा मित्र विशाल चक्रवर्ती व संशयितांची भांडणे सुरू होती.

चक्रवर्ती याने आवाज दिल्याने राजगुरू तेथे जाऊन भांडणे सोडवत असताना संशयितांनी त्यास शिवीगाळ करत चाकू हल्ला करून जखमी केले.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक देवरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या