Thursday, April 25, 2024
Homeनाशिककाकासाहेब वाघ महाविद्यालयाला चार अभ्यासक्रम मंजूर

काकासाहेब वाघ महाविद्यालयाला चार अभ्यासक्रम मंजूर

नाशिक । प्रतिनिधी

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास नुकतेच विद्यापीठ अनुदान आयोगाने विविध प्रकारच्या चार स्कील बेस कोर्सेसना मान्यता दिलेली आहे.

- Advertisement -

यात पायथॉन प्रोग्रामिंग अॅण्ड इंटरनेट ऑफ थिंग्स, मशरूम कॅल्टीव्हेशन ,कॉस्मेटोलॉजी आणि सेरीकल्चर या सर्टिफिकेट कोर्सेस चा समावेश आहे. पिंपळगाव परिसरातील रोजगाराची गरज लक्षात घेऊन महाविद्यालयाने वरील कोर्सेसची आखणी करून यु.जी.सी.कडे मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल केले होते.

या कोर्सेसचा लाभ महाविद्यालयातील विविध शाखामंधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. सदर कोर्सेससाठी २०२०-२०२१ या चालू शैक्षणिक वर्षात त्वरित प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल अशी माहिती प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे यांनी दिली.

महाविद्यालयास वरील अभ्यासक्रम मंजूर झाल्याबद्दल संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार,अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते यांनी अभिनंदन केले आहे. अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी प्रा.अभिजित पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या