Saturday, April 27, 2024
Homeनगरके.के.रेंज : संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी दिल्लीत बैठक !

के.के.रेंज : संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी दिल्लीत बैठक !

पारनेर |प्रतिनिधी| parner

पारनेर, नगर व राहुरी तालुक्यांतील 23 गावे हे के. के. रेंज अधिग्रहण कक्षात येत असल्याने व लष्कराच्या अधिकारी व वाहने गेले काही दिवसांपासून

- Advertisement -

या परिसरात फिरताना दिसत असल्यामुळे या गावातील नागरिकांचे जनजीवन अस्थिर झाले आहे. याप्रश्नी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत उद्या गुरूवारी दिल्लीत बैठक होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यासोबत पारनेरचे आ. निलेश लंके, राहुल झावरे आणि राहुरी-नगर तालुक्यातील शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

के. के. रेंजप्रश्नी पारनेर- नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आ. लंके हे बाधित 23 गावांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. यासंदर्भात आ. लंके यांनी वारंवार वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही केली आहे. यावेळी वनकुटे गावचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, राहुरीचे सभापती अण्णा सोडणार, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांचे शिष्टमंडळ सोमवारी खा. पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेलेले आहेत. खा. पवार व खा. सुप्रियाताई सुळे यांची मंगळवारी दिल्ली येथे भेट घेऊन आ लंके व सहकार्‍यांनी के.के. रेंज संदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानंतर उद्या संरक्षण मंत्री सिंग यांची गुरुवारी भेट घेणार आहेत.

खा. पवार यांनी या प्रश्नी आग्रहाची भूमिका घेतली आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प आपल्याला परवडणार नाही. या भाग मुळा धरण, काळू प्रकल्प यामुळे या भागात बागायत झालेले आहे. तसेच सविस्तर सर्व प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना भेटून सदर परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देऊ असे खासदार शरद पवार यांनी आश्वासित केले. यामुळे के.के. रेंजप्रश्नी गुरूवारी होणार्‍या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या