Tuesday, April 23, 2024
Homeनगरकरोना महामारीत खर्डा येथे 90 टक्के दवाखाने बंद

करोना महामारीत खर्डा येथे 90 टक्के दवाखाने बंद

खर्डा |वार्ताहर| Kharda

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील कर्मचारी संख्या कमी असल्याने आरोग्य यंत्रणेनेवर

- Advertisement -

मोठा ताण येत असून आमदार रोहित पवार यांनी याबाबत लक्ष घालावे अशी जनतेची मागणी आहे.

खर्डा येथे परिसरातील 36 गावांसाठी भव्य असे प्राथमिक आरोग्य केंद्र असून अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे, परंतु वैद्यकीय अधिकारी या पदासह सोबत 11 रिक्त पदे न भरल्यामुळे या प्राथमिक आरोग्य सेवेचा मोठा बोजवारा उडाला आहे.

करोनच्या या महामारीत खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉ. रुग्णांना उपचार नाकारत आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच खेड्यांमध्ये करोनाचा शिरकाव झाला असल्यामुळे खर्डा गावचे बरेच खाजगी हॉस्पिटल बंद असतात. लोकांना उपचार करायला खूप खूप टाळाटाळ करीत आहेत.

अनेक रुग्ण इतर आजाराच्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होत आहेत. सध्या तुटपुंज्या कर्मचार्‍यांना घेऊन ही आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. सध्यातर मोठा कळस निर्माण झाला आहे. येथे वैद्यकीय अधिकारी यांचे रिक्त पद आहे.

त्याबरोबर आरोग्य सेवक 4, औषध निर्माण अधिकारी 1, आरोग्य सेविका 1, कनिष्ठ सहाय्यक 1, परिचर 1, आरोग्य सहाय्यक 1, स्वीपर 1 अशी एकूण 11 पदे प्रशासनाने अद्यापपर्यंत भरली नाहीत. यामुळे सध्या येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना व रुग्णांना मोठा त्रास होत आहे.

त्यामुळे खर्ड्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे रिक्त पदे न भरल्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशा परिस्थितीत काम करीत आहे. तरी आमदार रोहित पवार यांनी याबाबत माहिती घेऊन ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या