Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : माणुसकीला नाही जात न धर्म, खान चाचा बनले समाजाचा आदर्श

Video : माणुसकीला नाही जात न धर्म, खान चाचा बनले समाजाचा आदर्श

नाशिक | Nashik

शासकीय अधिकारी म्हटला की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते एक नकारात्मक प्रतिमा, जी कोणाला समजून न घेता केवळ आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा वापर स्वत:च्या हितासाठी करणारा. मात्र काही शासकीय अधिकारी अपवाद असतात ते त्यांच्या वर्तणुकीने, समाजशील वृत्तीने आणि कर्तव्य पालनाने, असेच एक व्यक्तिमत्व जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथे खान चाचा (Khan Chacha) यांच्या रूपाने मिळाले आहे.

- Advertisement -

खान चाचांनी आपली संपूर्ण हयात शासकीय नोकरीत (Government job) घालवली, तलाठीपासून ते नायब तहसीलदारांपर्यंत त्यांनी शासकीय पद निभावली. सेवा काळात त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Destitute Yojana) अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळली, या काळात त्यांनी समाजाच्या वेदना जवळून बघितल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केला.

याबाबत खान चाचा यांनी देशदूतशी बोलतांना सांगितले की, आपल्याकडे येणारी एखादी व्यक्ती रडत आली तर ती जातांना हसत परत गेली पाहिजे असा समाजशील विचार कायम जपला आहे. तसेच आपण समाजाला काहीतरी दिले पाहिजे म्हणून समाजातील निराधार, कुपोषित बालकांचा शोध घेतला, त्यांचे पालकत्व (Parenthood) स्वीकारले आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात पूर्ण शक्तीनिशी उभं करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले.

दरम्यान, आजच्या घडीला खान चाचा यांनी सुमारे सव्वाशेच्या आसपास बालकांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांच्या या कार्यात कुटुंबातील इतर सदस्यही हातभार लावतात. याशिवाय कुटुंबातील सर्वच सदस्य शासकीय सेवेत असल्यामुळे ते सर्व खान चाचांच्या कार्याला सहकार्य करतात. त्यांच्या या कार्यामुळे माणुसकीचा खरा धर्म काय असतो हे खऱ्याअर्थाने बघायला मिळते.

- Advertisment -

ताज्या बातम्या