खाकी वर्दीने साजरी केली भटक्या कुटुंबातील मुलांसोबत दिवाळी

jalgaon-digital
2 Min Read

मोदलपाडा Modalpada ता.तळोदा वार्ताहर

 तळोदा पोलिसांनी (Taloda Police) दिवाळीत येथील अनाथ आश्रमातील (Orphanage) मुलांना कपडे वाटप(Distribution of clothes to children) करून व गांवाबाहेरील माळरानावर वस्ती करून राहणाऱ्या भटक्या कुटुंबातील मुलांना (nomadic family Children) दिवाळीचा फराळ (Diwali snacks distribution) वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवुन खाकी वर्दीतील (khaki uniform) माणुसकीचे दर्शन (vision of humanity) घडविले आहे.

पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात  आज तळोदा पो स्टे चे पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील दावलशा बाबा महिला उन्नती मंडळ संचलित अनाथ मुला मुलींचे बाकगृह येथील 38 मुलांना नवीन कपडे  तसेच गावाबाहेरील माळरानावर उद्योग व्यवसायानिमित्त वस्ती करून राहणाऱ्या भटक्या कुटुंबातील 40 मुलांना फराळाचे पॅकेट उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्या हस्ते वाटप केले.

यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला होता. दिवाळीच्या निमत्ताने  प्रत्येक जन आपल्या कुटुंबातील मुलांना नव-नवीन कपडे, खाऊ आणण्याच्या तयारीत असतो.अनाथ आश्रमात राहणारी मुलांना नवीन कपडे घेऊन द्यायला कुटुंबच नसते  व  कमी उत्पन्न गटातील व गावाबाहेरील माळरानावर वस्ती करून  राहणारी बरीच भटकी कुटुंबे अशी आहेत की, दिवाळीत आपल्या मुलांना नवीन कपडेच काय तर घरात दिवाळी फराळ देखील करू शकत नाहीत.

अश्या सर्व वंचित व निराधारांची दिवाळी सुद्धा नवीन कपड्यांनी व फराळाने साजरी व्हावी ही  संकल्पना पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी आपल्या पोलीस दलाच्या सहकार्याने प्रत्यक्षात आणली यासाठी तळोदा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे पोलीस कर्मचारी पो ना अजय कोळी पो कॉ अनिल पाडवी, हे कॉ देविदास वाडीले, पो कॉ रघुवीर रामोळे, होमगार्ड राजेंद्र मगरे यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *