Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकसारा घाटातील तो व्हिडिओ खोटा, काय आहे सत्य?

कसारा घाटातील तो व्हिडिओ खोटा, काय आहे सत्य?

नाशिक nashik

नाशिकमधील सोशल मीडियावर (Social media) आज एक व्हिडिओ (video) व्हायरल झाला. त्या व्हिडिओत (video)कसारा घाटात(kasara ghat) प्रचंड पाऊस झाल्याचे दिसत असून त्यामुळे आज रेल्वे व रस्ते वाहतूक बंद झाल्याचा दावा करण्यात आला. या व्हिडिओची सत्यता ‘देशदूत’ने तपासली.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात सोमवारी मोठा पाऊसच अजून झालेला नाही. इगतपुरी तालुक्यातही सामान्यच पाऊस होता. व्हिडिओत प्रचंड पावसामुळे खूप मोठा धबधबा सुरु झाल्याचे दिसत आहे. तसेच पावसामुळे भूस्खलन (landslide) किंवा डोंगराची कडा कोसळल्यामुळे क्रेनही आणल्याचे दिसत आहे. परंतु अशी परिस्थिती नव्हती. या व्हिडिओची सत्यता आम्ही तीन मार्गाने केली.

१)आमच्या इगतपुरी येथील वार्ताहराने कसारा घाटात वाहतूक सुरळीत असल्याचे सांगितले. तसेच आज मोठा पाऊसही झाला नसल्याचे सांगितले.

२) नाशिकच्या महामार्ग बसस्थानकावर चौकशी केली. यावेळी मुंबईकडून बसेस येत असून नाशिकहूनही मुंबईला बसेस जात असल्याचे सांगितले.

३)नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आम्ही चौकशी केली. त्यावेळी रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या