कानिफनाथ यात्रोत्सव सुरू

jalgaon-digital
3 Min Read

पंचाळे । प्रभाकर बेलोटे | Panchale

येथील कानिफनाथ महाराजांच्या (Kanifnath Maharaj) यात्रोत्सवास धुलीवंदनापासून (Dhulivandan) (दि. 18) सुरुवात होत असून यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. पाच दिवस चालणार्‍या या उत्सवात मोफत तमाशासह गोपाल काला (Gopal Kala) मुख्य आकर्षण असणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) पाथर्डी तालुक्यातील कानिफनाथाची मढी म्हणून प्रसिध्द असलेल्या मढी येथील कानिफनाथ देवस्थानंतर प्रति मढी म्हणून पंचाळे (panchale) येथील कानिफनाथांचा नावलौकिक आहे. कानिफनाथ महाराज नाशिक (nashik) मार्गे मढी (madhi) येथे जात असताना पंचाळे गावालगत मुक्कामी थांबले होते. त्यांनी वास्तव्य केलेल्या ठिकाणी पूर्वजांनी त्यांच्या स्मृती जतन रहाव्यात म्हणून गावाच्या पूर्व बाजूस अर्धा किलोमीटर अंतरावर कानिफनाथ मंदिराची (Kanifnath Temple) उभारणी केली आहे.

येथे दरवर्षी धुलीवंदन (dhulivandan) ते रंगपंचमी (rangpanchami) या पाच दिवस कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात्रेच्या खर्चासाठी गावाचे चार वाड्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. त्यामध्ये गावामध्ये थोरात आडनावाच्या ग्रामस्थांची संख्या जास्त असल्याने त्यांचे थोरला, मधला, धाकटा असे तीन वाडे व इतर आडनावाच्या ग्रामस्थांचा चौथा वाडा असे चार वाड्यांमध्ये यात्रेच्या खर्चासाठी विभाजन करण्यात आले आहे.

दर चार वर्षांनी एका वाडयास यात्रेचे यजमान पद मिळते. यजमानपद असलेला प्रत्येक वाडा त्यांच्या सभासदांकडून दरवर्षी वैयक्तिक वर्गणी जमा करून रथ मिरवणूक (Chariot procession), तमाशा, शोभेची दारु, मंदिरांवरील विद्युत रोषणाई यांचा खर्च करतात. तसेच रंग मंदिराजवळ गोपाल काल्यासाठी मंडप उभारणे, पाण्याची व्यवस्था, तमाशा कलावंतांच्या हजेरी, कुस्त्या, टांगा शर्यती यावर खर्च केला जातो.

कार्यक्रम वेळापत्रक

दररोज रात्री 9 वा. मोफत लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम रंगणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी सकाळी 9 वा. गंगाजल कावड, देव काठी, देवरथ, कानिफनाथ महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक होईल. दुपारी 11 वा. गोपाल काल्याचा कार्यक्रम, सायंकाळी रंगोत्सव व शोभेच्या दारुचा कार्यक्रम होणार आहे. दुसर्‍या दिवशी तमाशा कलावंतांची हजेरी, सायंकाळी कुस्त्या, दुपारी टांगा शर्यती हे कार्यक्रम होणार आहेत.

रथोत्सवात कलावंतांकडून कवणे

रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 4 वा. पंचाळे-शिंदेवाडी-धनगरवाडी येथील तमाशा कलावंतांच्या रथाची मिरवणूक निघते. या रथांच्या अग्रस्थानी कानिफनाथांचा रथ असतो. तमाशाच्या रथामध्ये तमाशा कलावंत कवणे, लावण्या गात असतात. ग्रामस्थ रंगांची उधळण करतात. या रंगोत्सवात सर्व आनंदाने सहभागी होतात.

उलाढालीला चालना

यात्रेसाठी मेवा, मिठाई, खेळण्यांची व कपड्यांची दुकाने व इतर सर्व दुकाने येतात. यात्रेसाठी पाच ते दहा हजार भाविक येत असल्याने यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. मागील वर्षी यात्रोत्सवात कोरोनामुळे खंड पडला होता. यावर्षी शासनाने निर्बंध शिथिल केल्याने यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *