Tuesday, April 23, 2024
Homeनगरकान्होजी आंग्रेंना गुगलने संबोधले समुद्री चाचे

कान्होजी आंग्रेंना गुगलने संबोधले समुद्री चाचे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार दलाचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख गुगल या सर्च इंजिनवर टाईप केल्यानंतर पायरेट्स अर्थात समुद्री चाचे असा येतो आहे. यामुळे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकत लहानचे मोठे झालेल्या सर्वांना मोठा धक्का बसला आहे. अशा शब्दांत गुगलने केलेल्या चुकीवर शिवप्रेमी नेटकरी तुटून पडले असून गुगलकडून कान्होजी आंग्रेंचा अवमान झाल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, सोशल मीडियात यावर जोरदार भाष्य सुरू असल्याने गुगलकडून दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे व त्यासाठी विशेष मोहीमही इंटरनेटवर सुरू करण्यात आली आहे.

मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा गुगल सर्चकडून अवमान करण्यात आल्याने शिवप्रेमी नेटकरी संतापले आहेत. कान्होजी आंग्रे यांची ओळख गुगलने समुद्रातील लुटारू किंवा समुद्री चाचा अशी करून दिल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी नेटकर्‍यांनी गुगलला याची जाणीव करून देत दुरुस्तीसाठी ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे. आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमारांबरोबर लढून मराठा आरमाराची स्थापना केली.

कान्होजी आंग्रे यांनी स्वराज्यावर परकियांनी केलेले समुद्री आक्रमण परतावून लावले. त्यासोबत कित्येक मोहिमा फत्ते केल्या. मात्र, गुगल सर्चमध्ये त्यांच्याबद्दल भलताच उल्लेख दिसून येत आहे. गुगलवर सर्च केल्यावर चुकीची माहिती येत आहे. डॉ. प्रशांत भाम्रे यांनी ही गोष्ट ट्विट करून समोर आणली आहे. हा आंग्रे यांच्यासोबतच छत्रपती शिवरायांचाही अवमान मानला जात आहे. त्यामुळे गुगलला धारेवर धरून यात दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सरखेल कान्होजी आंग्रे (ऑगस्ट 1669-4 जुलै 1729) 18 व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराची स्थापना केली. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेऊन आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठविण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या