‘अधिकार्‍यांनो पगाराइतके काम करा’ : डॉ. पवार

jalgaon-digital
3 Min Read

कळवण। प्रतिनिधी Kalwan

‘आढावा बैठकीत (Review meeting) माहिती लपवून काही होणार नाही. त्यापेक्षा गरजू आदिवासी लाभार्थ्यांची कामे करा, पगाराइतके काम करा, जेणे करून घरी जाऊन समाधानाची झोप घेता येईल नाही, तर वरच्या कोर्टात (देवाच्या) हिशोब होणारच आहे. याची काळज्या घ्या’, असा झणझणीत सल्ला कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister of State for Welfare and Health Dr. Bharti Pawar) यांनी दिला.

कळवण पंचायत समितीच्या (Kalvan Panchayat Samiti) सभागृहात राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सर्व खात्याचे अधिकारी यांची तालुक्यात सुरु असलेल्या कामांबद्दल आढावा बैठक घेतली. या बैठकीत मंत्री डॉ. पवार बोलत होत्या. या आढावा बैठकीत खाते निहाय विचारलेल्या प्रश्न व समस्यांबाबत एकाही खाते प्रमुखाला मुद्देसूद उत्तर देता आले नाही. आढावा बैठकीत मंत्रीमहोदयांना देण्यात आलेल्या लेखी कागदपत्रात अपूर्ण माहिती देण्यात आली.

विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. उपविभागीय अधिकारी विकास मीना (Sub Divisional Officer Vikas Meena), तहसीलदार बंडू कापसे (Tehsildar Bandu Kapase), गटविकास अधिकारी निलेश पाटील (Group Development Officer Nilesh Patil) यांना तालुक्यात किती अपंग व्यक्ती आहे, असा प्रश्न विचारल्या नंतर कोणालाच उत्तर देता आले नाही. यावेळी राज्यमंत्री पवार यांनी डोक्याला हात लावून संताप व्यक्त केला.

तहसीलदार कापसे यांना संजय गांधी निराधार योजनेपासून अनेक गरजू लाभार्थी वंचित असल्याचे निदर्शनास आणून दिले. लाभार्थ्यांना रेशन कार्ड (Ration card) मिळत नसल्याने त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्ड उपलब्ध करून द्यावे, गटविकास अधिकार्‍यांना रमाई घरकुल योजनेपासून (Ramai Gharkul Yojana) वंचित असलेल्या लाभार्थ्यांबाबत विचारले असता समाधान कर्क उत्तर मिळाले नाही.

केंद्र शासनाकडून राबविण्यात येणारी मातृत्व वंदना योजने बाबत तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना विचारले असता एकूण 993 लाभार्थी आहेत पैकी 715 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र कोणाला किती रकमेचा लाभ देण्यात आला ते सांगता आले नाही. त्यांच्याकडून देण्यात आलेल्या कागदावरील माहितीतही कोणतीच आकडेवारी देण्यात आली नव्हती.

बालविकास प्रकल्प अधिकर्‍यांना विचारलेल्या कुपोषित बालकांच्या संख्येबाबत व त्यांना देण्यात येत असलेली पोषण आहाराबाबत सॅमची 11 व म्यामची 185 बालके असल्याचे सांगण्यात आले. प्रविण रौंदळ यांनी महामंडळाकडून मका खरेदी सुरु करावी अशी मागणी करण्यात आली. एकूणच आढावा बैठकीत तक्ररींचा अक्षरशः पाऊस पडला होता.

अधिकार्‍यांना उत्तरे देण्यास अडचण येणार आल्याने हि बैठक जाणूनबुजून छोट्या जागेत घेण्यात आल्याचा आरोप भाजपाचे (bjp) नाही जिल्हाध्यक्ष विकास देशमुख व उपजिल्हाध्यक्ष सुधाकर पगार यांनी केला. जे अधिकारी या बैठकीस गैरहजर राहिले त्यांना नोटिसाकाढून कारवाई करावी अशी मागणी बेबीलाल पालवी यांनी केली.

या बैठकीस भाजपा तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, रविंद्र देवरे, एन. डी. गावित, शहराध्यक्ष निंबा पगार, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष गोविंद कोठावदे, तालुका सरचिटणीस डॉ. अनिल महाजन, सचिन सोनवणे, एस के पगार, हेमंत रावले, चेतन निकम, संदीप अमृतकर, विश्वास पाटील, सुनीला बस्ते यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, संचालक व भाजपा पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *