Friday, April 26, 2024
Homeनगरकाळे गटाचा कोल्हे गटाला धक्का

काळे गटाचा कोल्हे गटाला धक्का

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यात सरपंच पदाच्या निवडणुकीत काळे गटाने कोल्हे गटाला अनपेक्षितपणे धक्का देत तालुक्यातील घारी व ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर कब्जा मिळवून सत्ता मिळविली आहे.

- Advertisement -

मागील महिन्यात पार एकूण 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होऊन मंगळवारी29 ग्रामपंचायतींपैकी 26 ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी पार पडल्या असून यापैकी घारी व ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीप्रसंगी पार पडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काळे गटाने घारी व ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंचपदी आपल्या गटाच्या सदस्यांची वर्णी लावून ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका लालचंद जाधव, उपसरपंचपदी सोमनाथ जाकू झोरवर व घारीच्या सरपंचपदी रामदास कारभारी जाधव व उपसरपंचपदी सौ.ठकुबाई रामकिसन काटकर यांना निवडून आणून सत्ता मिळविण्यात यश मिळविले आहे.

ओगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे गटाचे 3 व कोल्हे 4 सदस्य निवडून आले होते व सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनुसार सरपंचपदाच्या उमेदवार देखील कोल्हे गटाच्या निवडून आल्या होत्या मात्र कोल्हे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार असलेल्या सौ. अलका लालचंद जाधव व सदस्या सौ. मीनाबाई अण्णासाहेब कोल्हे यांनी एक दिवस अगोदरच आमदार आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करून काळे गटात प्रवेश केल्यामुळे ओगदी ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच काळे गटाचे झाले आहेत.

अशीच परिस्थिती घारी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीप्रसंगी झाली असून या ग्रामपंचायतीमध्ये काळे गटाचे चार व कोल्हे गटाचे पाच सदस्य निवडून आले होते. मात्र कोल्हे गटाच्या सदस्या ठ्कुबाई रामकिसन काटकर यांनी देखील आमदार आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करत काळे गटात प्रवेश केल्यामुळे बहुमताच्या जोरावर घारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामदास कारभारी जाधव व उपसरपंचपदी सौ.ठकुबाई रामकिसन काटकर यांची निवड करण्यात येऊन या ग्रामपंचायतीवर देखील काळे गटाने आपला झेंडा रोवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या