Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरकाकडी विमानतळ संदर्भातील विविधप्रश्नी नामदार विखे यांना निवेदन

काकडी विमानतळ संदर्भातील विविधप्रश्नी नामदार विखे यांना निवेदन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काकडी विमानतळ संदर्भातील विविध प्रश्नासंदर्भात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना काकडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गुंजाळ यांनी निवेदन दिले.

- Advertisement -

ना. विखे पाटील यांच्या पुढाकाराने काकडी प्रश्नासंदर्भात बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली. बैठकीस खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक दीपक कपूर, काकडी एअरपोर्टचे व्यवस्थापक सुशिलकुमार श्रीवास्तव, एअर पोर्टचे इंजिनिअर कौस्तुभ ससाणे, तसेच अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ना. विखे पाटील यांना काकडी ग्रामस्थांच्यावतीने प्रभाकर गुंजाळ यांनी निवेदन दिले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे, मनसेचे नेते रामनाथ सदाफळ, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.काकडी येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि काकडी ग्रामस्थांच्या विमानतळ प्राधिकरणाकडे असलेल्या अपेक्षा यासंदर्भात तसेच नाईट लँडींग सुरू करावे, प्रवशांना योग्य त्या सुविधा निर्माण कराव्यात, यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली.

यासंदर्भात ना. विखे पाटील यांना काकडीचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गुंजाळ यांनी सह्याद्री अतिथीगृहावर निवेदन दिले. त्यात नाईट लँडिंगसह परिसरातील सर्व रस्त्यांची कामे व्हावीत. शिर्डी एअरपोर्टवर नोकरी देताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे, प्राधिकरणाकडे थकित असलेली ग्रामपंचायतीची साडेसात कोटी रुपयांची रक्कम मिळावी, आदी विविध मागण्या गुंजाळ यांनी ना. विखे पाटील यांच्याकडे केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या