जोमदार मंगळ रेषेमुळे सतत उत्साही काजोल

भविष्य आपल्या हाती
जोमदार मंगळ रेषेमुळे सतत उत्साही काजोल

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड - 8888747274

काजोलचा जन्म 5 ऑगस्ट 1975 रोजी झाला. बॉलिवूडमधील एक यशस्वी व उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक सन्मान प्राप्त काजोलने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.

सुप्रसिद्ध हिंदी चित्रतारका नूतन या काजोलच्या मावशी तर अभिनेत्री तनुजा या आई. अभिनयाचे बाळकडू आई व मावशीकडून आल्याने व स्वतःच्या मेहतीने अभिनय कौशल्याच्या जोरावर तिसर्‍या पिढितीतील मुखर्जी कुंटुबातील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले. काजोलला 2011 मध्ये भारत सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले.

काजोल यांनी 1992मध्ये बाजीगर चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनयासाठी त्यांनी आपले शिक्षण सोडले. त्यांचा पहिलाच चित्रपट शाहरुख खानसोबत होता. या चित्रपटला प्रचंड व्यावसायिक यश मिळाले. शाहरुख खान सोबत ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ आणि ’कुछ कुछ होता है’ असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट गाजले.

या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार पटकावले. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील अभिनयासाठी काजोल यांना तिसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. काजोलने यांनी अजय देवगणसोबत विवाह केल्यानंतर चित्रपटातून काळी काळासाठी अंतर राखले.

रोमँटिक थ्रिलर ‘फना’ या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर यशस्वी पुनरागमन केले. त्यानंतर त्यांनी ‘यू मै और हम फॅमिली’, ‘माय नेम इज खान’, आणि ‘दिलवाले’ या चित्रपटातून मुख्य भूमिका साकारल्या. फना आणि माय नेम इज खान मधील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअरमध्ये आणखी दोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले. 2020 मध्ये देवगण मिडिया निर्मित ‘तान्हाजी’ या हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. अभिनयशिवाय त्या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत. विधवा, अनाथ मुलांसाठी कार्य करतात. देवगण एंटरटेनमेंट लिमिटेड या कंपनीत त्या महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात.

प्रतिभावान अभिनेत्री काजोल

मुखर्जी घराण्याशी संबंधित, काकू नूतनपासून आई तनुजा यांना अभिनयाचे धडे घ्यावे लागले नाही. मुळातच अभिनयाचे अंग काजोल यांनी 1990चे दशक गाजविले. काजोल या चित्रपट निर्माते मुखर्जी यांच्या घराण्यातल्या. त्यामुळे काजोल यांना चित्रपटात येण्यासाठी किंवा काम मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही. परंरपरागत अभिनयाचा वारसा घेऊन आलेल्या काजोल यांनी शिक्षण अर्धवट सोडून अभिनयाच्या क्षेत्रात सहजी पदार्पण केले व अक्षरशः रुपरी पडदा गाजविला.

सावळा रंग असूनही बोलके डोळे आणि ताकदीचा अभिनयाच्या जोरावर त्यांनी यश गाठले. त्यांची चुलबुली ही प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. कामात उत्साही, बेधडक अभिनय आई तनुजाचे गुण काजोलले उचलले. त्यांच्या दोन्ही हातावरील मस्तक रेषा आयुष्य रेषेपासून स्वतंत्र उगम पावत आहेत.

आयुष्य रेषेपासून दोन तीन मिलिमिटरवर मस्तक रेषेचा उगम म्हणजे ह्या व्यक्ती आत्यंतिक हुशार प्रतिभावान असतात. त्यातच दोन्ही हातावरची मस्तक रेषा चंद्र उंचवट्यावर उतरल्याने अभिनय शिकावा लागला नाही. चित्रपटातील अभिनयात आवाजाला व संवादफेकीला खूप महत्व आहे. अभिताभ बच्चन यांच्या खर्जातील आवाजाची जादू आजही कायम आहे.

काजोल यांची संवादफेक उत्तम आहे. उजव्या हातावरील करंगळी लांब असल्याने स्मरणशक्ती बरोबरच संवादामध्ये स्पष्टता येते. आवाजातील चढ उतार, दुःखद प्रसंग असो अथवा भावनिक, क्रोधी असो या प्रसंगानुसार अभिनयाबरोबरची संवादफेकीमुळे अभिनयातील कामाचा दर्जा कमालीचा वाढतो व तो करंगळी लांब असल्याने बुध ग्रहाचे बुध ग्रहाचे शुभ गुण, शुभ कारकत्व काजोल यांना लाभले आहे.

हातावरील बोटांचे शेवट म्हणजे नखाच्या मागच्या बाजूचे शेवटचे टोके गोलाकार असल्याने त्यांच्यापर्यंत आलेल्या संवेदनांचे पृथ्थकरण उत्तम होते. कामत घाई गडबड होत नाही. वेंधळेपणा असत नाही. भाग्य रेषेचा उगम चंद्र ग्रहावरून होत असल्याने दुसर्‍याच्या मदतीने किंवा साहय्याने अशा लोकांचा उत्कर्ष होत असतो. रवी रेषेचा उगम भाग्य रेषेतून झाल्याने व भाग्य रेषेला आयुष्य रेषेतून एक रेषा जाऊन मिळाल्याने आर्थिक प्रश्न कधीच आला नाही व येणारही नाही.

कामासाठी व पैशासाठी धडपड हा विषय रवी व भाग्य रेषेने मिटवून टाकला. रवी रेषेने उत्तुंग यश मिळवून दिले. राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय ख्याती झाली. फिल्मफेयरचे पुरस्कार मिळाले. दोनही हातावरची हृदय रेषा सरळ गुरु ग्रहावर गेल्याने आपला स्वार्थ उत्तम समजतो. हे लोक भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व जास्त देतात. त्यामुळेच जीवनात ते यशस्वी होतात. हृदय रेषे वरून प्रेम, वात्सल्य, करुणा व स्वार्थी भाव पहिला जातो.

आयुष्य रेषा दोन्ही हातावर सुदृढ व शुभकारक आहे. त्यामुळे जोम व उत्साह आहे. आजाराची किरकिर नाही, तब्येतीची किरकिर नाही, त्यातच उजव्या हातावर आयुष्य रेषेला जोडून मंगळ रेषा आहे. ही वयाच्या 17 व्या वर्षी उगम पाऊन ती वय वर्ष 62 पर्यन्त आहे. उजव्या हातावरील म्हणजे कर्माच्या हातावरील मंगळ रेषा जोमदार असल्याने शारीरिक काम करण्याची क्षमता मोठी आहे. असे लोक 18-18 तास काम करू शकतात.

शिवाय हे कायम उत्साही असतात. अंगठा मजबूत आहे. त्याचे दुसरे पेर विस्तारित आहे, ते छोटे नाही. त्यामुळे ठरवलेल्या कामामध्ये दिरंगाई होत नाही व वेळेत काम पूर्ण करण्याची मानसिकता असते. आळसात किंवा स्वप्नात दिवस घालवीत नाही. एक जोशपूर्ण उत्साही गुणी अभिनेत्री म्हणून काजोल ओळखल्या जातात.

अभिनयात भाव-भावनेबरोबरच अवखळपणा प्रेक्षकांना भावतो. चित्रपटात अभिनय करताना समरस होऊन काम करणे हे खास वैशिट्य. मजबूत व प्रमाणशीर अंगठ्याचे दोन्ही पेर, ठरवलेल्या कामात त्वरित अंमलबजावणी करतात व मस्तक रेषा व बुध ग्रह व त्याच्या करंगळीच्या लांब बोटामुळे साध्य झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com