Friday, April 26, 2024
Homeनगर'नागेबाबा’चे चेअरमन काळे यांची फेसबुकवर बदनामी

‘नागेबाबा’चे चेअरमन काळे यांची फेसबुकवर बदनामी

अहमदनगर|Ahmedagar

नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे यांची फेसबुकवर बदनामी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कडूभाऊ काळे यांनी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फेसबुकवर भाऊसाहेब एन. शिंदे या नावाने पोस्ट करणार्‍या व्यक्तीविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

भाऊसाहेब एन. शिंदे या नावाने फेसबुकचे खाते असलेल्या व्यक्तीने 22 जानेवारी 2022 च्यापूर्वी नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे यांच्याविषयी वाईट भाषेत लिखाण करून पोस्ट केली. रघुराम राजनची जागा घेतो काय, असे म्हणत त्यांच्या घरच्यांविषयी वाईट भाषेत फेसबुकवर लिखाण केले आहे. तसेच फेसबुकवर पोस्ट करून शिवीगाळ, दमदाटी करून कडूभाऊ काळे व नागेबाबा पतसंस्थेची बदनामी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फेसबुकवर बदनामीकारक मजकूर टाकल्याचा प्रकार लक्षात येताच कडूभाऊ काळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवार, 22 जानेवारी 2022 रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीसोबत फेसबुकवर टाकलेल्या मजकूराच्या झेरॉक्स प्रती जोडल्या आहेत. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या