Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशठरलं! गणेश चतुर्थीला Jio AirFibre लॉन्च होणार, मुकेश अंबानींची घोषणा

ठरलं! गणेश चतुर्थीला Jio AirFibre लॉन्च होणार, मुकेश अंबानींची घोषणा

मुंबई | Mumbai

रिलायन्स जिओ कंपनीकडून अखेर जबरदस्त घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स १९ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीला ‘जिओ एअर फायबर’ लॉन्च करणार आहे. म्हणजे वायरशिवाय फास्ट ब्रॉडबँड मिळेल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली.

- Advertisement -

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, ”१ कोटीहून अधिक परिसर आमच्या ऑप्टिकल फायबर सेवेशी, जिओ फायबरशी जोडलेले आहेत. तरीही लाखो परिसर आहेत जिथे वायर जोडणे अवघड आहे. जिओ एअर फायबर ही अडचण कमी करेल. याद्वारे आम्ही २० कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची आमची अपेक्षा आहे. Jio Air Fibe सादर केल्यामुळे, Jio दररोज १.५ लाख नवीन ग्राहक जोडू शकेल.”

जिओचे ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण भारतात १५ लाख किमी परिसरात पसरलेले आहे. सरासरी ऑप्टिकल फायबरचा ग्राहक दरमहा २८० GB पेक्षा जास्त डेटा वापरतो, जो Jio च्या दरडोई मोबाईल डेटा वापराच्या १० पट आहे. एजीएममध्ये Jio Air Fiber सोबतच ‘Jio True 5G डेव्हलपर प्लॅटफॉर्म’ आणि ‘Jio True 5G लॅब’ लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली.

Jio Air Fiber आहे तरी काय?

Jio Air Fiber ने बऱ्याच गोष्ट बदलणार आहेत. उदाहरणच द्यायचं झाल्यास, तुम्ही आवडीने पाहत असलेल्या क्रिकेट मॅचचा फील यामुळे बदलणार. हे एक असं डिव्हाइस असणार आहे ज्यामुळे तुम्ही बिना वायर कनेक्टिव्हीटी हाय स्पीड डेटाचा आनंद घेऊ शकणार आहात. यामुळे तुम्ही तुमच्या घरातही WiFi हॉटस्पॉट देखील तयार करू शकणार आहात. Jio Air Fiber या सिंगल डिव्हाइसच्या वापरामुळे तुम्हाला उत्तम इंटरनेट एक्सपीरियन्स मिळेल, याने घरात आणि ऑफिसमध्ये गिगाबाईट इंटरनेट स्पीड मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या