Friday, April 26, 2024
Homeनाशिकजेव्हा चोरीला गेलेली दागिन्यांची बॅग पोलीस घरपोच आणून देतात...

जेव्हा चोरीला गेलेली दागिन्यांची बॅग पोलीस घरपोच आणून देतात…

नाशिक | Nashik

रक्षाबंधनासाठी (Rakshabandhan) आलेल्या महिलेची दागिन्यांची बॅग शोधण्यात सरकारवाडा पोलिसांना (Sarkarwada Police) यश आले आहे. महिलेने नाशिक पोलिसांचे आभार मानले आहेत….

- Advertisement -

सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी (Police Inspector Hemant Somvanshi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा प्रकाश मेहता ही महिला रविवारी सकाळी साडेअकरा वाजता मुंबईहून (Mumbai) नाशिकच्या ठक्कर बाजार बसस्थानकावर (Thakkar Bajar Bus Stand) उतरली आणि रिक्षाने कस्तुरबा नगरला पोहोचली.

पण मनीषा मेहता उतरल्यानंतर तिने रिक्षामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग विसरली आणि सरकार वाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक पवार आणि डीबी पथकाची टीम त्रंबक नाका (Trimbak Naka) सिग्नलवर गेली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. आणि रोख रक्कम असलेली बॅग सुरक्षितपणे ताब्यात घेतली आहे.

महिला रक्षाबंधनासाठी आली होती, तिची सासू तिचे दागिने हरवल्याने तणावाच्या स्थितीत होती. ती खूप रडत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या