Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशJEE Advanced 2020 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

JEE Advanced 2020 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

दिल्ली | Delhi

यावर्षी जेईई अ‍ॅडव्हान्सची परीक्षा 27 सप्टेंबर 2020 दिवशी पार पडली होती. देशातील 222 शहरांमध्ये 1001 परीक्षा केंद्रांवर जेईई अ‍ॅडव्हांसची पार पडली होती. आज या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. पुण्याचा चिराग फलोर हा देशात प्रथम आला आहे. एकूण 43,204 जण पात्र ठरले असून यामध्ये 6,707 मुलींचा समावेश आहे.

- Advertisement -

jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर तो जाहीर करण्यात आला आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कोअर कार्ड सोबतच आज All India Rankings (AIR) म्हणजेच देशातील त्यांचं रॅंकिंग देखील पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना जेईई अ‍ॅडव्हान्सच्या अधिकृत संकेतस्थळावर credentials टाकून निकाल पाहता येणार आहे. त्यासोबतच रॅंकिंग पाहून पुढील प्रवेशाची प्रक्रिया सुरू करता येणार आहे.

असा करा निकाल चेक…

jeeadv.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.

होम पेज वर तुम्हांला JEE Advanced Result 2020 link दिसेल.

वेबपेजवर तुम्हांला विचारण्यात आलेली अत्यावश्यक माहिती भरा आणि सबमीट क्लिक करा.

त्यानंतर तुम्हांला स्क्रिनवर निकाल पाहता येईल.

हा निकाल तुम्ही डाऊनलोड करू शकता. सेव्ह करून ठेवू शकता.

- Advertisment -

ताज्या बातम्या