Tuesday, April 23, 2024
Homeनगरजायकवाडी धरणात आढळली महाकाय मृत मगर

जायकवाडी धरणात आढळली महाकाय मृत मगर

पैठण |प्रतिनिधी| Paithan

येथील जायकवाडी धरणात मंगळवारी (दि.1) सायंकाळी मृत अवस्थेत सात फूट लांबीची महाकाय मगर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वन्यजीव विभागाच्या वतीने मगरीचा देह पाण्या बाहेर काढून कार्यालयात हलविण्यात आला. शवविच्छेदना नंतर नमुने पुणे व औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या कर्‍हेटाकळी परिसरातील बँकवाटर क्षेत्रात पाण्याच्या कडेला सात फूट लांबीची मगर परिसरातील नागरिकांना आढळून आल्याने त्यांची धावपळ उडाली. मात्र मगर कुठलीही हालचाल करत नसल्याने शुभम चौतमल यांनी मगरीच्या जवळ जाऊन निरीक्षण केले असता त्यांना मगर मरण पावली असल्याचे लक्षात आले. या बाबत त्यांनी पैठण येथील वन्यजीव विभागास कळविले. वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री बांगर यांनी सहाय्यक वनसंरक्षक डॉ राजेंद्र लाळे यांना कल्पना देऊन तातडीने घटनास्थळी जाऊन मगरीची पाहणी केली.

वनपरिमंडळ अधिकारी रूपाली सोळसे, वनरक्षक राहूल नरवडे, रामेश्वर बोडखे, कल्याण राठोड, प्राणीमित्र शुभम चौतमल व स्थानिक नागरिक व वन्यजीव विभागाच्या कर्मचार्‍यांनी मगरीचा मृतदेह पाण्याबाहेर काढून तो पैठण येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात हलवीला आहे. दरम्यान पैठण येथील पशुचिकित्सालय रूग्णालयात मगरीचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी औरंगाबाद व पुण्याला बुधवारी पाठवण्यात आहे. मगरीच्या मृत्यू कशामुळे झाला हे अहवालानंतर स्पष्ट होईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री बांगर यांनी सांगितले.

2006 नंतर ठराविक कालावधी नंतर जायकवाडी धरणाच्या नाथसागरात मगरीचे दर्शन होत होते. मात्र जलसाठ्यात मगर मरण पावल्याची पहिलीच घटना असून मगर कशामुळे मरण पावली असावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या