Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारजवाहर नवोदय विद्यालयाची आज प्रवेश परीक्षा

जवाहर नवोदय विद्यालयाची आज प्रवेश परीक्षा

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

जवाहर नवोदय विद्यालय(Jawahar Navodaya Vidyalaya),प्रवेश परीक्षा (entrance exam) एकलव्य रेसिडेंशियल स्कूल (Eklavya Residential School) नंदुरबार येथे 2022-23 साठी इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी होणारी निवड चाचणी (Selection test) 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे

- Advertisement -

जवाहर नवोदय विद्यालय,प्रवेश परीक्षा एकलव्य रेसिडेंशियल स्कूल नंदुरबार येथे 2022-23 साठी इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी (admission to the sixth) होणारी निवड चाचणी 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार असून ती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होणार आहे .

नंदुरबार जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांनी , पालकांनी , शाळांनी यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरले आहेत त्यांनी आपले प्रवेशपत्र नवोदय विद्यालय समितीच्या http://www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करून त्यावर शाळेच्या मुख्याध्यापक , प्राचार्य यांचा सही , शिक्का करून प्रमाणित करून घेऊन परीक्षेदिवशी सोबत ठेवावे .

या संदर्भात काही अडचण वाटल्यास प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत ( 9022103161 ) यांना संपर्क साधावा .

- Advertisment -

ताज्या बातम्या