चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक शरण

jalgaon-digital
1 Min Read

श्रीनगर | srinagar –

जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी चार दहशतवाद्यांंना चकमकीत ठार केले, तर एक दहशतवादी शरण आला आहे.

घटनास्थळावरून शस्त्र व स्फोटकांचा मोठा साठा ताब्यात घेण्यात आला असून, या भागात अजूनही काही अतिरेकी लपले आहेत. Jammu and Kashmir 4 Terrorists Killed

दक्षिण काश्मीरच्या किलूरा भागातील एका पडक्या झोपडीत हे अतिरेकी लपले होते. ठार झालेल्या अतिरेक्यांपैकी दोघांचा सरपंच निसार अहमद भट यांच्या हत्येत सहभाग होता. सरपंच भट गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता होते. ते भाजपासमर्थित उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यांचा गोळ्यांनी चाळणी केलेला मृतदेह आढळून आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *