जळगाव : संचारबंदी आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी सलून, बांधकाम व्यावसायिकांवरही कारवाई

जळगाव | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सलून, बांधकाम व्यावसायिक, मजूर , रिक्षाचालक, आणि रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या तिघं मोटारसायकलस्वारांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याजवळील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर त्या व्यक्तींना समज देवून सोडून देण्यात आले.

खंडेरावनगराजवळ प्रांजल हेअर सलून मंगळवारी सकाळी ९ वाजता सुरू होते. याबाबत सलून व्यावसायिक सुनील एकनाथ साळवे (वय ३५, रा.हरिविठ्ठलनगर) यास पोलिसांनी ताब्यात घेवून समज देवून नंतर सोडून देण्यात आले. शोयबखान लियाकतखान (वय २६, रा.गेंदालाल मिल परिसर) हा काव्यरत्नावली चौकात रिक्षा चालवताना आढळला. गणपतीनगर परिसरातील वाणी मंगल कार्यालयाच्या परिसरात बांधकाम सुरू होते. याबाबत मिस्तरी आरिफअली आजमअली (वय ३९, रा.आझादनगर, पिंप्राळा), आजीम शेख हमीद शेख (वय ३५, रा.ख्वॉजानगर, गणेश कॉलनी), शेख तोशीब शेख हबीब (रा.ख्वॉजानगर, पिंप्राळा), ठेकेदार अहमद खान युसूफ खान (आझादनगर, पिंप्राळा) यांच्यावर कारवाई झाली. तसेच राजेश रोहिदास राठोड (वय २४, रा.गणेश कॉलनी), लखन अंगूर मखराल (वय २४, रा. ख्वॉजानगर, गणेश कॉलनी) आणि संजू जयता राठोड (वय २४, गणेश कॉलनी) हे तिघं एका मोटारसायकलवर विनाकारण फिरत होते. त्यांना पोलिसांनी गणपतीनगरातील रस्त्यावर पकडले. त्यांच्याविरुद्धही एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवाई झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com