Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedजिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित नवीन ८ रुग्ण दाखल

जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित नवीन ८ रुग्ण दाखल

जळगाव – 

जिल्हा रुग्णालयात गुरुवारी सायंकाळपर्यंत कोरोना संशयित  नवीन आठ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. संशयित तीन रुग्णांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तर ३४ अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती कोरोना नियंत्रण कक्षाचे समन्वयक डॉ.विलास मालकर यांनी दिली.

- Advertisement -

या रुग्णालयात आतापर्यंंत २६६ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. यातील एकूण २२८ अहवाल निगेटिव्ह आले. निकषात नसल्यामुळे दोन अहवाल नाकारण्यात आले. दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातील मेहरुणमधील रुग्णाचे पॉझिटिव्ह नंतर फेरतपासणीतील दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्याची सुटका झाली आहे.

तर सालारनगरातील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. या रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडीत गुरुवारी सायंकाळपर्यंत १३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत ३८८४ रुग्णांचे स्क्रिनिंग झाले आहे. आतापर्यंत एकूण १८६ रुग्णांना होम कॉरंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.

अहवालास विलंब

या रुग्णालयामार्फत औरंगाबाद व धुळ्यातील प्रयोगशाळेत रुग्णांचे स्वॅब पाठवण्यात येत आहे. परंतु, अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाठवण्यात येत असलेल्या स्वॅबचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही.

गुरुवारी आलेले अहवाल हे चार दिवसांपूर्वीच्या स्वॅबचे आहेत.  जिल्हा रुग्णालयात मंगळवारी दाखल झालेल्या कोरोना संशयित दोन रुग्णांचा बुधवारी मृत्यू  झाला. त्यांचाही अहवाल गुरुवारी मिळू शकला नाही.

मालेगावातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या दफनविधीस   चाळीसगावातील सहा जण गेले होते. त्यांना काही प्रमाणात त्रास झाल्यामुळे या सहा जणांना जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले.

त्यांचे स्वॅब घेवून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले  आहे. परंतु, त्यांचाही अहवाल अद्याप आला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या