वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू

jalgaon-digital
5 Min Read

जळगाव – Jalgaon :

शहरातील सिंधी कॉलनी परिसरात जुन्या भांडणातून तरुणाला बेदम मारहाण केली आहे.तर दुसर्‍या घटनेत

रामेश्वर कॉलनीत 32 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. तिसर्‍या घटनेत परप्रांतिय ट्रक क्लिनरचा हृदयविकाराने मृत्यू मृत्यू झाला आहे.

चौथ्या घटनेत ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करीत शनीपेठ पोलिसांनी डंपरवर चालकावर कारवाई केली आहे.

दरम्यान , सोमवारी अपघात आणि दोनजणांनी आत्महत्या केली आहे. तसेच बेकायदेशीर वाळू वाहतुकीला पोलिसांनी कारवाई करीत लगाम घातला आहे.

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

बेकायदेशीर वाळूची मध्यरात्री वाहतूक करणार्‍या डंपरचा पाठलाग करून चालकासह क्लिनरला शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे.

शनीपेठ पोलीस ठाण्यात चालक, मालक आणि क्लिनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील कांचननगर परिसरात शनीवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वेलाईन ममुराबादकडून जळगावात विना नंबर क्रमांक डंपरमध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याचे दिसून आले.

डंपर रोखण्याचा प्रयत्न केला असता डंपर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान डंपरचा पाठलाग केला असता शनीपेठ पोलीस हद्दीतील भिलपूरा पोलीस चौकीजवळ थांबविले. डंपरचालक शेख रईस शेख रऊफ (वय 23) आणि शेख शाबीर शेख युनूस (वय19) रा. ख्वाजा चौक आव्हाणे रा. खेडी ता.जि.जळगाव यांना अटक केली आहे.

हे वाहन भूषण सपकाळे (पुर्ण नाव माहित नाही) रा. खेडी ता.जि.जळगाव यांचे आहे. शनीपेठ पोलीस हद्दीत डंपर जप्त करण्यात आले आहे. पोलीस कॉन्टेबल सचिन प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वर कॉलनीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रामेश्वर कॉलनीतील 32 वर्षीय तरुणाने घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकी आली.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.रामेश्वर कॉलनीतील गणपती मंदीरासमोर भाड्याच्या खोलीत राहणारा संतोष मोहन भालेराव (वय-32, रा. पोहेगाव, ता. कोपरगाव जि. नगर ) हा तरूण एमआयडीसीतील चटई कंपनीत कामाला होता.

गेल्या 10 ते 12 वर्षांपासून जळगावात स्थायिक झाला होता. दोन वर्षांपुर्वी पत्नी माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे तो एकटाच राहत होता.

आई व वडील यांचे निधन झालेले आहे. घरात नैराश्येतून मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली. घरमालक संतोष बोलेकर रा. रामेश्वर कॉलनी हे सकाळी उठल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद होता. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता संतोष भालेराव याने छाताला साडीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

संतोषचे पाहुणे धर्मराज बनसोडे यांना घरमालक बोलेकर यांनी फोन करून गळफास घेतल्याचे कळविले. डॉ. सचिन अहिरे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

परप्रांतीय ट्रक क्लीनरचा हृदयविकाराने मृत्यू

कर्नाटक राज्यातून ट्रकमध्ये आणलेला माल जळगावात खाली करून एका पेट्रोलपंपावर मुक्कामाला असलेल्या ट्रकवरील क्लिनरचा हृदयविकराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लंकेश अंबराया कोटारगी (वय-26, रा. दस्तापूर ता.जि. गुल्बारंगा, कर्नाटक) हा ट्रकवर क्लिनर म्हणून कामाला आहे.

ट्रान्सपोर्ट करणार्‍या ट्रकच्या मालासोबतच तो जळगावात आला. जळगावात माल खाली केल्यानंतर दोन दिवसांनंतर पुन्हा येथून माल भरून कर्नाटकात घेऊन जायचे होते. यासाठी ट्रक चालकासह क्लिनर लंकेश हे दोघे जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील पटेल या पेट्रोलपंपावर मुक्कामास थांबले.

शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास अचानक उलटी होऊन लंकेशच्या छातीत त्रास व्हायला लागला. त्यास ट्रकचालकासह पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांनी तातडीने खासगी रुग्णालयात हलविले.

रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास लंकेशची प्राणज्योत मालवली. त्याचे आप्तेष्ट जळगावकडे येत आहेत.

सिंधी कॉलनी परिसरात तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा

शहरातील सिंधीकॉलनी परिसरात जुन्या भांडण्याच्या वादातून तिघांनी शनिवारी मध्यरात्री एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. पृथ्वी चंदनानी (वय25) रा. चंदूलाल रसवंतीजवळ, गणेश कॉलनी हे नामेदव कुळकर्णी यांच्या घरात गेल्या 4 वर्षांपासून भाड्याच्या घरात राहतात.

कामाच्या निंमित्ताने त्यांच्याकडे (एमएच 19, बीएल 2207) दुचाकी असून कामासाठी दुचाकीचा वापर करतात. दि.24 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजता नवदुर्गा मित्रमंडळ सिंधी कॉलनी येथे भाविकांसाठी प्रसाद बनविण्याचे काम करत असतांना थोड्यावेळाने ते झोपले.

पहाटे 3.45 वाजता सौरभने घेतलेला मोबाईल परत मागितला असता नकार दिल्यानंतर सौरभ यांच्यासह अनोळखी दोन ते तीन जणांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

पृथ्वीच्या ताब्यातील दुचाकी आणि मोबाईल असा एकुण 60 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरी हिसकावून घेतला. पृथ्वींच्या फिर्यादीवरून सौरभसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *