जळगाव : आर.के.वाइन प्रकरणी तीन पोलीस कर्मचारी बडतर्फ; एक निलंबित

जळगाव : आर.के.वाइन प्रकरणी तीन पोलीस कर्मचारी बडतर्फ; एक निलंबित

जळगाव – आर. के. वाइन प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर  तीन पोलीस कर्मचार्‍यांना बडतर्फ, तर एकाला यांना निलंबित करण्यात आले. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांचाही बडतर्फचा प्रस्ताव महासंचालकांकडे रवाना केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी  दिली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांंविरुद्ध   गुन्हा दाखल झाला. यातील  आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हापेठचे संजय जगन्नाथ जाधव व पोलीस मुख्यालयातील कर्मचारी मनोज सुरवाडे या तीन पोलिसांना बडतर्फ,  तर तालुका पोलीस ठाण्यातील भारत शांताराम पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. तर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांचा बडतर्फचा प्रस्ताव महासंचालकांकडे रवाना झाला आहे, असेही अधीक्षक डॉ.उगले यांनी नमूद केले.
काय आहे प्रकरण?
अप्पर पोलीस अधीक्षक नवटके यांनी केलेल्या चौकशीअंती  पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह इतर कर्मचार्‍यांची आर.के.वाइन या दारू विक्री दुकानात भागीदारी असल्याचे व दुकान मालक दिनेश नोतवाणी यांच्या खात्यातून संंबंधित कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर काही रक्कम वर्ग झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यानंतर या पाचही जणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम क, ६५ (इ), ८२, ८३ सह साथीचे रोग नियंत्रण अधिनियम १८९७ चे कलम ३ आदेशाचे उल्लंघन. भादंवि कलम १८८, २६९, २७० व आपत्ती व्यवस्थापन कलम ९१ (ब) प्रमाणे वाढीव कलम महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम १९४९ चे कलम ८१, ७२, ७५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४५ (क), भादंवि कलम ११४, ११६ प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com