Friday, April 26, 2024
Homeजळगाव‘जागर स्वच्छतेचा’ चित्ररथाचा शुभारंभ

‘जागर स्वच्छतेचा’ चित्ररथाचा शुभारंभ

जळगाव – jalgaon

जागतिक हात धुवा दिवसानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हावासियांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी. याकरीता तयार करण्यात आलेल्या ‘जागर स्वच्छतेचा’ चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी

- Advertisement -

कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकरी राहूल पाटील, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे आदि उपस्थित होते.

जागतिक हात धुवा अभियानानिमित्ताने युनिसेफ व जिल्हा प्रशासन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हात धुणे, स्वच्छता बाळगणे व कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी याबाबत स्वच्छता रथाद्वारे नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याकरीता 19 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत हा चित्ररथ जिल्हाभर जनजागृतीसाठी फिरविण्यात येणार आहे. चित्ररथाद्वारे तसेच विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी यांचेवतीने पथनाट्य सादर करुन स्वच्छता राखण्याचे आवाहन नागरीकांना करण्यात येणार आहे.

स्वच्छता जागर चित्ररथ 19 ऑक्टोबर रोजी शिरसोली, एरंडोल, पिंपळकोठा, धरणगाव, पाळधी बु. याठिकाणी जाऊत जनजागृती करेल. दि.20 ऑक्टोबर रोजी चोपडा, अडावद, अमळनेर, डांगर बु. पारोळा, राजवड येथे, दि.21 ऑक्टोबर रोजी चाळीसगाव, पातोंडा, कजगाव, भडगाव, पाचोरा, नगरदेवळा येथे, दि.22 ऑक्टोबर रोजी जामनेर, नेरी, बोदवड, नाडगाव, मुक्ताईनगर, कोथळी येथे तर दि.23 ऑक्टोबर रोजी रावेर, मोरगाव, यावल, भालोद, भुसावळ, फुलगाव येथे रथाचा समारोप होईल.

चित्ररथाचे आपल्या गावात आगमन झाल्यावर नागरीकांनी शारिरीक अंतराचे पालन करुन उपस्थित रहावे व स्वच्छतेचे महत्व जाणून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या