Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशमहाराष्ट्र बँकेसह तीन बँकांचे खासगीकरण करा

महाराष्ट्र बँकेसह तीन बँकांचे खासगीकरण करा

नवी दिल्ली | New Delhi –

बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आणि सिंध बँक व युको बँक या तीन सरकारी बँकांचे खाजगीकरण privatisation करण्याची शिफारस नीती आयोगाने NITI Aayog केंद्र सरकारकडे केली आहे. याशिवाय सर्व ग्रामीण बँकांचे पोस्टात विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला असून एनबीएफसीला जादा सवलती देण्याचीही शिफारस निती आयोगाने केली आहे.

- Advertisement -

भारतीय टपाल कार्यालयाच्या ऑफिसाचे देशभर जाळे आहे. त्याच्या मदतीने ग्रामीण बँकाचे पोस्टात विलीनीकरण करून त्या अधिक सक्षम करण्याचा केंद्राचा विचार आहे. संपूर्ण देशात टपाल विभागाची जवळपास 15 लाख कार्यालये आहेत. देशातील निम्म्यापेक्षा जास्त बँकांचे खाजगीकरण करण्याची योजना सरकारने आखली आहे.

त्यानुसार सरकार बँकांचे खासगीकरण करत आहे. त्याची सुरुवात बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक या बँकांचे समभाग विकून करण्याची शक्यता आहे. यासंबंधी बुधवारी पंतप्रधान मोदी आणि बँकांच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. बँकांच्या खासगीकरणासाठी कायद्यातील कलम 170 मध्ये सुधारणा करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या