Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशइराणचा पाकवर सर्जिकल स्ट्राईक ; दोन सैनिकांची केली सुटका

इराणचा पाकवर सर्जिकल स्ट्राईक ; दोन सैनिकांची केली सुटका

नवी दिल्ली –

इराणने पाकिस्तावर सर्जिकल स्ट्राईक करुन कैदेत असलेल्या आपल्या दोन सैनिकांची सुटका केली आहे. इराणच्या एलिट रिव्होल्युशनरी गार्डसने (आयआरजीसी) ही मोहिम

- Advertisement -

यशस्वी केली. जैश उल-अदल या दहशतवादी संघटनेने अडीच वर्षांपूर्वी इराणच्या दोन सैनिकांचे सीमेहून अपहरण करुन त्यांना बंधक बनवले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसनी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ऑपरेशन करुन त्यांची सुटका केली. तसेच आयआरजीसीने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सैनिकांना पुन्हा इराणमध्ये यशस्वीरीत्या पाठवण्यात आले.

जैश उल-अदल नामक पाकिस्तानातील वाहाबी दहशतवादी संघटनेने 16 ऑक्टोबर 2018 रोजी इराण-पाकिस्तान सीमेवरुन 12 एलिट रिव्होल्युशनरी गार्डसच्या सैनिकांचे अपहरण केले होते. या सैनिकांच्या सुटकेसाठी इराण आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍यांनी समिती बनवण्यात आली होती. अपहरण झालेल्या 12 पैकी पाच जणांची 15 नोव्हेंबर 2018 रोजी सुटका करण्यात आली होती. त्यानंतर 21 मार्च 2019 रोजी पाकिस्तानी लष्कराने चार इराणी सैनिकांची सुटका केली.

इराणने जैश उल-अदलला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. इराणमध्ये राहणार्‍या बलोच सुन्नींच्या अधिकारांच्या रक्षणासाठी जैश उल-अदलच्या इराण सरकारविरोधात कारवाया सुरु असतात. जैश उल-अदलनेच फेब्रुवारी 2019 मध्ये इराणच्या बसीज या निमलष्करी तळावर हल्ला केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या