Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाआमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : हिंगोली,रायगडला आघाडीचे गुण

आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : हिंगोली,रायगडला आघाडीचे गुण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) राज्यस्तरीय 14 वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या (Invitation Cricket League) दोन दिवसीय कसोटी सामन्यात (Test Match) महात्मानगर क्रिकेट मैदानावर (Mahatmanagar Cricket Ground) हिंगोलीने (Hingoli) नाशिकवर (Nashik) तर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब (Golf Club) येथे रायगडने (Raigad) औरंगाबादवर (Aurangabad) पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले. पहिल्या सामन्यात औरंगाबाद विरुद्ध 99 वर नाबाद राहिलेल्या नील चंद्रात्रेने (Neel Chandratre) नाशिकतर्फे शतक झळकावले…

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक

महात्मा नगर क्रिकेट मैदान : नाशिक विरुद्ध हिंगोली

नाशिक पहिला डाव – सर्वबाद 211 – नील चंद्रात्रे 102, ऋग्वेद जाधव 37. ओमकार मोगल 4 तर सुमित सोळुंके 3 बळी . हिंगोली पहिला डाव – सर्वबाद 316 – ओमकार मोगल 98, सौरव बिराजदार 50. नील चंद्रात्रे 4 तर अथर्व सूर्यवंशी 2 बळी.

सामना अनिर्णीत. हिंगोलीला पहिल्या डावातील आघाडीचे गुण.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब : औरंगाबाद विरुद्ध रायगड

औरंगाबाद पहिला डाव: सर्वबाद 242 – अरेझ खान 62, मोहम्मद अली नाबाद 32, अमय भोसले 5 तर शौर्य गायकवाड 5 बळी.

रायगड पहिला डाव: 9 बाद 253 – स्मित पाटिल नाबाद 81, ओम म्हात्रे 58 . मोहम्मद अली व तनुज काळे प्रत्येकी 2 बळी . सामना अनिर्णीत. रायगडला पहिल्या डावातील आघाडीचे गुण.

- Advertisment -

ताज्या बातम्या