Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयफोन टॅपिंग प्रकरणी फडणवीस यांची चौकशी करा- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीस यांची चौकशी करा- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

फोन टॅपिंग प्रकरणी ( Phone tapping case ) वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरीही या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक असल्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे. सरकारमधील कोणा वरिष्ठाचा आशीर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणे अशक्य आहे. त्यामुळे फोन टॅप प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे (The role of Devendra Fadnavis should also be investigated in phone tapping case ), अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole )यांनी रविवारी केली.

- Advertisement -

रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी फोन टॅपिंगचे रेकॉर्ड त्यांनी कोणाला दिले ? फोन टॅपिंगचा मुळ उद्देश काय होता? रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे आदेश कोणी दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. राज्य सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढवून जलदगतीने तपास करावा आणि या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण हे शोधून त्याच्यावरही कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना २०१७-१८ साली माझ्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपतील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते. अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचे दाखवून आमचे फोन टॅप करण्यात आले, माझे नाव अमजद खान असे ठेवले होते तर बच्चू कडू यांचे निजामुद्दीन बाबू शेख अशी मुस्लीम नावे ठेवली होती. फोन टॅपिंगचा मुद्दा मी विधानसभेतही उपस्थित करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती, असे पटोले यांनी सांगितले.

दहशतवादी कारवाया, अंमली पदार्थांचा व्यापार अशा गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी विशेष परवानगी घेऊन फोन टॅपिंग केले जाते. परंतु आमचा याच्याशी काहीही संबंध नसताना तो दाखवून फोन टॅप करण्यात आले. फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे . तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे आहे. केंद्रातील मोदी सरकारनेही अशाच पद्धतीने पेगॅससच्या माध्यमातून मंत्री, राजकीय नेते, न्यायपालिका, पत्रकार यांची हेरगिरी केल्याचे उघड झाले आहे. तोही याच पद्धतीचा प्रकार होता, अशी टीका पटोले यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या