Friday, April 26, 2024
Homeनगरव्याजासाठी ट्रॅक्टर ओढून नेणार्‍या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

व्याजासाठी ट्रॅक्टर ओढून नेणार्‍या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

व्याजाच्या रकमेसाठी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ट्रॅक्टर ओढून नेणार्‍या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महेंद्र उर्फ गणेश (रा. नेटकेवाडी, ता. कर्जत) असे आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत अमोल दळवी (रा. दळवी वस्ती, कर्जत) याने फिर्याद दिली. याबाबत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार दळवी याने आर्थिक अडचणीमुळे महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके याच्याकडून काही रक्कम घेतली होती. ती साधारण साडेपाच लाख रुपयांपर्यंत घेतली होती. नेटके याने 17 जून रोजी अमोल दळवी व वैभव दळवी यांच्या घरात घुसला. व्याजाने घेतलेले साडेलाख रुपये व त्यावरील व्याजासह 10 लाख रुपये द्या अशी मागणी करत नेटके याने दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दळवी यांचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (एमएच 16 एफ 6766) बळजबरीने चोरून नेताना म्हणाला की, दहा लाख रुपये द्या अन् ट्रॅक्टर घेऊन जा. पैसे द्यायचे नसेल तर तुमची जमीन माझे नावावर करून दे, नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी नेटके याने दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक केली. त्याच्याकडून ट्रॅक्टरही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार सलिम शेख, उद्धव दिंडे, अमित बर्डे, मनोज लातूरकर यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या