Friday, April 26, 2024
Homeनाशिकमोबाईलचा जुगाड करू , पण इंटरनेटच काय..!

मोबाईलचा जुगाड करू , पण इंटरनेटच काय..!

इगतपुरी । Igtapuri

देशात सर्वत्र करोना महामारीचे संकट असुन सध्या शाळा व महाविद्यालये बंद आहेत. या काळात विद्यार्थानां अभ्यास करण्यासाठी शालेय विभागाने प्रत्येक विद्यार्थाला स्मार्ट फोनद्वारे ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे.

- Advertisement -

शिक्षण म्हणुन परिपाठ व शालेय सराव परिक्षा सक्तीच्या केल्याने ज्या पालकांचे दोन किंवा अधिक पाल्य शाळा शिकत असेल अशा विद्यार्थानां मोबाईल घेणे व त्यात नेटचा रिचार्जसाठी लागणारा खर्च न परवडणारा आहे. एवढे करूनही काही ग्रामीण भागात नेटवर्क उपलब्ध नाही.

अशा परीस्थीतीत परिक्षाच्या भितीने विद्यार्थानां अभ्यास करता येत नाही. या कारणाने अनेक पालकांच्या तक्रारीची दखल घेत (दि.०७) रोजी भाजपा नगरसेवक दिनेश कोळेकर यांनी महात्मा गांधी हायस्कुलचे मुख्याध्यापक अरूण गायकवाड यांना निवेदनाद्वारे पालकांचे म्हणने मांडुन यात बदल करावा असे सुचवले.

इगतपुरी तालुका हा आदिवासी व दुर्गमभाग असुन रोजगार व आर्थिक दृष्टया मागासलेला असल्याने मुलांची शाळेची फी भरणे पालकांना कठीण असते.

अशा वेळी महागडे स्मार्ट फोन व इंटरनेटचा खर्च कुठून करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात काही पालकांचा व्यवसाय बंद तर काहींच्या नोकऱ्या सुटल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, या काळात कठीण झाले आहे. या करीता सोयीचा मार्ग काढावा असे कोळेकर यांनी सांगितले.

इयत्ता ९ वी १० वी च्या विद्यार्थानां सराव व्हावा व ऑनलाइन अभ्यास व्हावा, शिक्षणात खंडता होऊ नये या करीता स्मार्टफोनद्वारे परिक्षा घेतल्या जातात. तर ज्या विद्यार्थाकडे मोबाईल नाही, काही ठिकाणी नेट नाही अशा अडचणी समजुन त्या भागातील देवळात किंवा पर्यायी जागेत प्रत्येक विषयाचे दररोज वेळेनुसार एक शिक्षक रोज त्या विद्यार्थानां शिकविण्याचे काम करतो.

– अरूण गायकवाड, मुख्याध्यापक, महात्मा गांधी हायस्कुल, इगतपुरी

- Advertisment -

ताज्या बातम्या