Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशInternational Tea Day 2021 : आज दिवस 'चहा'त्यांचा! जाणून घ्या चहाचा रंजक...

International Tea Day 2021 : आज दिवस ‘चहा’त्यांचा! जाणून घ्या चहाचा रंजक इतिहास…

चहाला वेळ नाही, पण वेळेला चहा मात्र नक्की लागतो! हो ना?? असच काहीसं नात आहे कित्येक लोकांचं चहाशी. दिवसातून किमान एक दोन कप तरी चहा घेतल्याशिवाय या लोकांना जमतच नाही. आज अशा या ‘चहा’त्यांचा खास दिवस.. आपण जाणून घेऊयात या चहाचा रंजक इतिहास!

चहा बर्‍याचदा ब्रिटिश पेय आहे आणि ब्रिटिशांमुळेच भारतात आला आहे असं आपण समजतो. पण खरं तर याचा इतिहास याहून खूप पूर्वीचा आहे. चहाचा इतिहास चीन पासून सुरू होतो. आख्यायिकेनुसार इ.स.पू. २७३७ मध्ये, चिनी सम्राट शेन नंग एका झाडाच्या खाली बसला होता. तेव्हा त्याचा नोकर पिण्याचे पाणी उकळत होता, तेव्हा झाडाची काही पाने उडून पाण्यात पडली.

- Advertisement -

शेन नंग हा प्रख्यात हर्बलिस्ट (वनस्पतींपासून औषध बनवणारा) होता. त्याने चुकून पडलेल्या झाडाच्या पानांमुळे तयार झालेलं हे पेय पिण्याचा निर्णय घेतला. ते झाड कॅमेलिया सिनेन्सिस चे होते. आणि त्या झलांच्या पानांमुळे जे पेय्य तयार झाले त्याला आज आपण चहा म्हणतो. परंतु आख्यायिका सोडून पुरावे बघायचा विचार केला तर चीन मध्ये हान राजवटीच्या (Han Dynasty) काळातील चहाचे डब्बे मिळाले आहेत.

पण तंग राजवटीच्या (Tang Dynasty) काळात चहा चीनचा राष्ट्रीय पेय बनला. तिकडे चहा इतका प्रसिद्ध झाला की आठव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘लू यु’ (Lu Yu) नावाच्या एका लेखकाने चहावर एक पुस्तकच लिहिले. त्या पुस्तकाचे नाव ‘The Ch’a Ching’ म्हणजेच ‘Tea Classic’ असे होते. यानंतर लगेचच बौद्ध भिक्षुमार्फत चहाचा परिचय जपान मध्ये झाला.

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात चहाचे काही उल्लेख युरोपात सापडतात. सर्वप्रथम चहा युरोपात पोर्तुगाल मध्ये आला. परंतु मोठ्या प्रमाणात चहा आयात करणारा पहिला देश नेदरलँड बनला. १६०६ मध्ये चहाचा पहिला माल चायनातून नेदरलँडमध्ये आला. पण चहा पुढे पूर्ण युरोपात प्रसिद्ध झाला. परंतु सुरवातीला युरोपात चहाची किंमत जास्त असल्यामुळे चहा हे पेय्य फक्त श्रीमंतांचे मानले जायचे.

इंग्लंड मध्ये चहाचा पहिला लिखित संदर्भ सप्टेंबर १६५८ मधील लंडन मधील ‘मर्क्युरियस पॉलिटिकस’ या वृत्तपत्रातील जाहिरातीत मिळतो. त्यात असे लिहिले होते की, “चीनमधील पेय, ज्याला तिकडची लोकं ‘Tcha’ म्हणतात आणि अन्य देशातील लोकं ‘Tay Alias Tee’ म्हणतात, तो चहा शहरातील स्वीटिंग्स रेंट्स मधील कॉफी हाऊस मध्ये विक्रीस आहे.

१६६४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी मार्फत चहाची पहिली ऑर्डर चीनकडून जावा बेटांमधून आली होती. ईस्ट इंडिया कंपनीने चहा भारतात पिकवण्याचा निर्णय घेतला करत भारत त्यांच्यासाठी महत्वाचा व्यापारी केंद्र होता. त्यांनी १८३९ आसाम मधून सुरवात केली. अशाप्रकारे भारताला सुद्धा चहाचा परिचय झाला.

(माहिती स्रोत : इंटरनेटवरील विविध साईट्स)

- Advertisment -

ताज्या बातम्या