Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपोलीस आयुक्तालय विभागांत खांदेपालट

पोलीस आयुक्तालय विभागांत खांदेपालट

नाशिक | Nashik

जिल्हाभरातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यानंतर शहर आयुक्तालयाअंतर्गत 5 सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये शहर आयुक्तालयात नव्याने तीन सहायक आयुक्त रुजू झाले आहेत. तर विभाग दोन व वाहतुक विभागाचे सहायक आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी हे निवृत्त झाले आहेत.

रिक्त जागा व नव्याने रुजू झालेल्या सहायक आयुक्तांची पदस्थापना करण्यासाठी पोलीस अस्थापना मंडळाच्या वतीने या बदल्या करण्यात आल्या आहेत. झालेल्या बंदल्यांनुसार अशोक नखाते यांच्याकडे विभाग ३ व विभाग ४ चा पदभार आहे. त्यांना विभाग ३ येथेच नेमणुक देण्यात आली आहे.

त्यांच्याकडील विभाग ४ ची जबाबदारी सध्या गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले समीर नजीर शेख यांच्याकडे देण्यात आली आहे. तर शेख यांच्या जागी गुन्हे शाखेची जबाबादारी यापुर्वी आयुक्तालयात कार्यरत असलेले व काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथून बदली होऊन आलेले मोहन ठाकुर यांच्याकडे देण्यात आली आहे.

मंगलसिंग सुर्यवंशी यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या विभाग २ ची जबाबदारी नव्याने बदली होऊन आलेल्या सहायक आयुक्त दिपाली मोहन खन्ना यांच्याकडे देण्यात आली आहे. तर वाहतुक शाखेची जबाबदारी नव्याने बदलून आलेले सिताराम गणपत गायकवाड यांच्याकडे देण्यात आली आहे.

तर विभाग १ येथे कार्यरत प्रदिप जाधव यांची नेमणुक कायम करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयात दाखल झालेल्या नव्या दमाच्या अधिकार्‍यांकडून शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत काय पावले उचलली जातात याकडे नाशिकरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या