Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसीसीटीव्ही कॅमेरे बसवावे; व्यापारी संघटनेची मागणी

सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे; व्यापारी संघटनेची मागणी

नांंदगांव l Nandgaon (प्रतिनिधी)

नांदगाव शहरातील वाढती बाजारपेठत वाढते खरेदीदार यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. शहरात होणाऱ्या चोऱ्या प्रमाण वाढले आहेत.

- Advertisement -

यासाठी शहरातील मुख्य ठिकाणी व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे,अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.

नांदगाव शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या नागरिकांची प्रमाणावर गर्दी होत असते. शहरात होणाऱ्या चोऱ्याचे व खिसे पाकीट चोरी व दुचाकी चोरीचे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील मुख्य ठिकाणी व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.

अनेक वेळा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून पुन्हा मागणी व्यापारी संघटनेने मुख्यधिकारी

पंकज गोसावी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष प्रकाश कळंत्री उपाध्यक्ष विश्वासराव कवडे, प्रदिप सिसोदिया, सेक्रेटरी विजय चोपडा, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या