Friday, April 26, 2024
Homeनगरअभियंत्यांवर शाईफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अभियंत्यांवर शाईफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे (National Highways Office) उपअभियंत्यांच्या अंगावर शाई (Ink) फेकल्याची घटना बुधवारी दुपारी शहरातील कार्यालयात घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दाखल करण्यात आली आहे. उपअभियंता दिलीप नारायण तारडे (वय 54 रा. मिस्कीननगर, टिव्ही सेंटर, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मोहन पोटे (रा. निंबोडी ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

- Advertisement -

भरधाव डंपरखाली 19 मेंढ्यांचा चिरडून मृत्यू

पोटे यांने नगर-जामखेड महामार्गावरील (Nagar-Jamkhed Highway) निबोंडी ते चिंचोडी पाटील-आठवड गावापर्यंत रस्त्यावर क्रॉसिंग पट्टे व गतीरोधक बसविण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे निवेदन देऊन केली होती. बुधवारी दुपारी पोटे राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय कार्यालयात गेला होता. पोटे याने गतिरोधक बसविण्याची मागणी केली असता फिर्यादी तारडे त्याला सविस्तर माहिती देत असताना त्याने तारडे यांच्या अंगावर शाई (Ink) फेकली. पोलीस हवालदार गणेश धोत्रे अधिक तपास करत आहेत.

माळीचिंचोरा फाटा येथे रस्तालूट करणारे दोघे जेरबंदझाडे तोडण्यावरुन महिलेवर विळ्याने हल्ला

- Advertisment -

ताज्या बातम्या