Saturday, April 27, 2024
Homeधुळेधुळ्यात 15 दिवसानंतर आढळले दोन कोरोना बाधित

धुळ्यात 15 दिवसानंतर आढळले दोन कोरोना बाधित

धुळे Dhule। प्रतिनिधी

राज्यात सर्वप्रथम कोरोनामुक्त होणार्‍या धुळे शहरात (city of Dhule) 15 दिवसानंतर दोन कोरोना बाधीत (Infected two corona)आढळून आले आहेत. जिल्ह्यात बाधितांची संख्या 45 हजार 872 वर पोहचली आहे.

- Advertisement -

राज्यात सर्वप्रथम धुळे शहर कोरोनामुक्त झाले होते. परंतू त्यानंतर नागरिक बेफिकर वागत असून मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टन्स पाळत नाहीत त्यामुळे कोरोना वाढण्याची भिती व्यक्त केली जात होती.

तब्बल 15 दिवसानंतर शहरात दोन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा एक अहवाल 77 वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह आढळून आला. तर एसीपीएम लॅबमधील एक अहवाल साईदर्शन कॉलनीतील 50 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 668 जणांचा बळी गेला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 261 तर ग्र्रामीण भागात 407 जणांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या